Video : नागपूरमध्ये सशस्त्र दरोडा; गोळीबार करत दरोडेखोरांनी माजवली दहशत!

आठ ते दहा दरोडेखोरांनी शेतातील एका घरावर हल्ला चढवला व गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. घटनेचा CCTV फुटेज होतोय व्हायरल
Video : नागपूरमध्ये सशस्त्र दरोडा; गोळीबार करत दरोडेखोरांनी माजवली दहशत!
Video : नागपूरमध्ये सशस्त्र दरोडा; गोळीबार करत दरोडेखोरांनी माजवली दहशत!SaamTvNews

नागपूर : नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील नवी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर-जबलपूर हायवेवर, आवंडी गावापासून एक किमी अंतरावर यशपाल शर्मा यांचे शेतात घर आहे. या परिसरात त्यांचे एकमेव घर असून आजूबाजूला शेतात काम करणारे मजूर राहतात. आसपास कोणत्याही प्रकारची लोकवस्ती नसल्याने त्यांच्या घरावर दरोडा (Robbery) टाकण्याच्या उद्देशाने आठ ते दहा जण तोंडावर कापड बांधून त्या ठिकाणी आले. (Nagpur Crime News)

ह्या सर्व दरोडेखोरांजवळ घातक शस्त्र (Weapons) आणि बंदुका (Pistol) देखील होत्या. बाहेर काहीतरी हालचाली सुरु असल्याचा अंदाज असल्यावर शर्मा यांच्या कुटुंबातील एक सदस्य घराबाहेर येताच एका दरोडेखोराने गोळीबार केला. मात्र, शर्मा यांच्या शेतात काम करणारे मजूर गोळीबाराचा आवाज ऐकून बाहेर पडले खरे; पण, शस्त्रधारी दरोडेखोरांना पाहून हे मजूर घाबरून पुन्हा घरात गेले. यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला, दगडफेक केली आणि शिव्या देखील दिल्या. मात्र, घराबाहेर कोणी आले नाही आणि घरात जास्त लोक असल्यामुळे दरोडेखोरांचा दरोडा घालण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.

Video : नागपूरमध्ये सशस्त्र दरोडा; गोळीबार करत दरोडेखोरांनी माजवली दहशत!
धक्कादायक! 'तुमचे पैसे पडल्याचे' सांगत व्यापाऱ्याचे 9 लाख पळवले

थोड्या वेळातच सर्व दरोडेखोर (Robbers) निघून गेले. सुदैवाने या चित्तथरारक घटनेत कुठलीही जीवित हानी किंवा कोणी जखमी झाले नाही. मात्र, शर्मा यांच्या चारचाकी वाहनाच्या काचा दरोडेखोरांनी फोडल्या. हे सर्व दरोडेखोर CCTV मध्ये कैद झाले असून पोलीस आता सीसीटीव्ही च्या आधारे या आरोपींचा शोध घेत आहेत. दरोडे खोरांनी एकटे घर असल्याचं पाहून त्या ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न केला खरा मात्र त्यात ते यशस्वी झाले मात्र यामुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com