Maval News Saam tv
ऍग्रो वन

Success Story : दहावी नापास झाला तरी कमावतोय करोडो रुपये; तरुणाने मावळमध्ये फुलवली गुलाबाची शेती

maval News : पारंपरिक भातशेती न करता शेतकऱ्यांनी काहीतरी वेगळं केलं पाहिजे हा विचार मावळमधील मुकुंद ठाकर यांना आला. पवनानगर येथे असलेल्या आपल्या चार गुंठ्यांत फुलशेती सुरू केली. सुरुवातीला गुलाबाची लागवड

दिलीप कांबळे

मावळ : मावळ खर तर भात शेतीच आगार म्हणून ओळखल जात. हजारो हेक्टरवर भात शेती केली जाते. येथील शेतकऱ्यांचे मुख्य व्यवसाय हा भात शेतीच आहे. मात्र भात शेतीचाच व्यवसाय न करता काहीतरी वेगळं करून शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण करण्याचे काम मावळच्या एका अवलियाने केलं आहे. जेमतेम दहावी नापास शिक्षण झालेल्या मुलाने गुलाबाची शेती केली. यातून आता करोडो रुपये कमावतो आहे. 

पारंपरिक भातशेती न करता शेतकऱ्यांनी (Farmer) काहीतरी वेगळं केलं पाहिजे हा विचार मावळमधील मुकुंद ठाकर यांना आला. पवनानगर येथे असलेल्या आपल्या चार गुंठ्यांत फुलशेती सुरू केली. सुरुवातीला गुलाबाची लागवड केली. त्यानंतर अनेक अडचणींचा सामना मुकुंद ठाकर यांना करावा लागला. सुरुवातीला स्थानिक बाजारपेठेत फुलांची निर्यात सुरू केली. मात्र कालांतराने स्थानिक बाजारपेठेत फुलांना भाव कमी मिळू लागल्याने अनेकदा नुकसान सोसावे लागले. तरी देखील यात यशस्वी होऊन दाखवायचे ही जिद्द मुकुंद ठाकर यांची होती.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात 
यामुळे कालांतराने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ठाकर यांनी फुलांची निर्यात सुरू केली. दुबई, जपान, मलेशिया, ऑस्ट्रेलियात गुलाबाला मोठी मागणी आहे. आता दहा ते पंधरा देशात गुलाबाची निर्यात सुरू केली. (valentine day) व्हॅलेंटाइन डे च्या काळात लाखो गुलाबाची निर्यात करून ते आठ ते दहा करोड रुपयांची उलाढाल दरवर्षी केली जाते. दरवषी जपान, इंग्लंड, ऑस्ट्रेलियामधून अनेक शेतकरी पवनानगरला येऊन ठाकर यांच्या गुलाब शेतीला भेट देतात. विशेष म्हणजे ही कंपनी सांभाळण्यासाठी घरातीलच सर्व सदस्य काम करतात. सर्व भाऊ, आणि नातेवाईक मंडळी मिळून ही कंपनी चालवतात. त्यामुळे आजही एकत्र कुटुंब पद्धती ठाकर यांच्या घरी टिकून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT