Farmer Success Story Saam tv
ऍग्रो वन

Farmer Success Story : सेंद्रिय गुळ उत्पादनात शेतकरी महिलेची भरारी; वर्षाकाठी घेताय १० लाखाचे उत्पन्न

Latur News : अनेक जण शेती सोडून शहराकडे स्थलांतर करत आहेत याला कारण निसर्गाचा लहरीपणामुळे होणारे नुकसान शिवाय शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेती परवडत नाही. यामुळे शेतकरी शेतीपासून लांब जात आहेत

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: शेती परवडत नाही; या विचारातून अनेकांना शेती म्हटलं की, नकोशी वाट वाटत आहे. यामुळे अनेक तरुण स्वतःची शेती आणि गाव सोडून रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर होत आहेत. मात्र अशा परिस्थितीत देखील लातूरमध्ये एका महिला शेतकऱ्यांने पारंपारिक शेती सोबत सेंद्रिय गुळाचे उत्पादन घेण्यास सुरवात केली. यातून वर्षाकाठी लाखोंची उलाढाल करत आहे. 

आज अनेकांना शेती नकोशी वाटत आहे. शेतीत कष्ट करणारे शेतकरी आता क्वचितच पाहायला मिळत आहे. अनेक जण शेती सोडून शहराकडे स्थलांतर करत आहेत. अर्थात याला कारण देखील आहेत. निसर्गाचा लहरीपणामुळे होणारे नुकसान. शिवाय शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेती परवडत नाही. यामुळे शेतकरी शेतीपासून लांब जात आहेत. मात्र अशा परिस्थितीत देखील लातूरच्या खोपेगाव येथील एका ३५ वर्षीय महिला शेतकरीने रासायनिक शेतीला बगल देत पारंपारिक आणि सेंद्रिय शेतीकडे कल दिला आहे.

दहा वर्षांपासून यशस्वी 

मोहिनी कोल्हे या महिला शेतकरीने स्वतःच्या पाच एकर शेतीतून सेंद्रिय ऊस लागवड करण्यास सुरवात केली. इतकेच नाही तर त्यापासून सेंद्रिय गुळ निर्मितीचा उद्योग मागच्या दहा वर्षापासून उभा केला आहे. तो व्यवसाय यशस्वीरित्या चालवत आहेत. अर्थात शेतीत देखील योग्य नियोजन आणि मेहनत जर असेल तर शेती देखील परवडणारी आहे. त्यामुळे मागणीनुसार उत्पादन आणि वातावरणानुसार शेती ही शेतीची खरे सूत्रे आहेत; हे मोहिनी कोल्हे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. 

आठ ते दहा लाखांचे उत्पादन 
सेंद्रिय गुळ उत्पादनातून मोहिनी कोल्हे ह्या वर्षाकाठी आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पादन घेत आहेत. आपल्या ५ एकर शेतीत सेंद्रिय  पद्धतीने ऊस लागवड करून त्यांनी हे साध्य केल आहे. या व्यवसायात त्यांना त्यांच्या पतीचा, मुलाचा आणि सासर्‍यांचा मोठा सहभाग मिळाला आहे. २०१४ पासून उभारण्यात आलेल्या या गूळ व्यवसायात त्यांनी सध्या चांगलं मार्केट टिकून धरल आहे. पुणे, मुंबई, सोलापूर, संभाजीनगर या भागात देखील त्या सध्या गुळ पुरवठा करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT