Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance: पीकविम्‍यापासून शेतकरी वंचित; मनसेचे प्रतीकात्मक फाशी आंदोलन

पीकविम्‍यापासून शेतकरी वंचित; मनसेचे प्रतीकात्मक फाशी आंदोलन

दीपक क्षीरसागर

लातूर : चालू वर्षी लातूर जिल्ह्यामध्ये निसर्गाच्या अनेक संकटांचा मारा शेतकऱ्यावर झाला. यातून औसा तालुक्यातील अनेक गावांना (Crop Insurance) पिक विम्यातून वगळले आहे. या विरोधात आज औसा तहसील कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS) प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. (Latur News Crop Insurance)

लातूर (Latur) जिल्ह्यात मुख्यतः सहा लाख हेक्टर या पेरणी क्षेत्रापैकी जवळपास चार लाख 80 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली. दरम्यान गोगलगाय, अतिवृष्टी, मोजक अशा रोगांचा सोयाबीन (Soybean) पिकावर मोठा हल्ला झाला. यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) संपूर्ण अर्थकारण असलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पिक विम्‍यापासून वंचित

चालू वर्षी राज्य सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुदान तर विमा कंपन्यांनी ठराविक भागातच पिक विमा जाहीर केला. यामुळे खरं पाहता जिल्ह्यात सर्वत्र गोगलगाय, अतिवृष्टी आणि बुरशीजन्य रोगांचा धोका असतानाही शेतकरी विमापासून वंचित राहिल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या नेतृत्वाखाली औसा तहसील कार्यालयात प्रतिकात्मक फाशी घेण्याचा आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी मोठ्या संख्येने मनसे सैनिक आणि शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : कोलेस्ट्रॉल नॉर्मल असूनही येतोय हार्ट अटॅक, 'हे' छोटे कारण ठरतेय धोकादायक

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

High cholesterol: फक्त आहारात या 5 पदार्थांचा करा समावेश; रक्तावाहिन्यांमध्ये साचलेली चरबी लगेच निघून जाईल

भाजप नेत्याचा 'हायटेक' कारनामा, एमटीएनएलच्या २० लाखांच्या केबलवर डल्ला; १३ जण गजाआड

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

SCROLL FOR NEXT