Dhule: जनावरांचा बाजार भरणाऱ्या ठिकाणी पोलिस तैनात

जनावरांचा बाजार भरणाऱ्या ठिकाणी पोलिस तैनात
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : लम्‍पी स्‍कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचा बाजार भरविण्यावर बंदी आहे. तरी देखील आठवडे बाजार (Lumpy Disease) भरविला होता. यामुळे आजच्‍या आठवडे बाजाराच्‍या दिवशी गुरांचा बाजार भरू नये; याकरीता पोलिस (Police) तैनात करण्यात आले आहेत. (Dhule News Lumpy Virus)

Dhule News
Nashik: वन कर्मचाऱ्यांचा मुलगाच मुख्‍य सुत्रधार; बिबट्याची कातडी, निलगाय शिंग तस्‍करी प्रकरण

लम्‍पी स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे (Dhule News) जिल्हा प्रशासनातर्फे जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील गेल्या आठवड्यामध्ये मंगळवार या बाजाराच्या दिवशी वरखेडी रोड परिसरामध्ये अवैधपणे जनावरांचा बाजार भरवण्यात आला होता. या संदर्भात (Dhule Police) आझाद नगर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत बाजार भरवणाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज देखील मंगळवारी गेल्या आठवड्याप्रमाणे जनावरांचा बाजार भरवला जाऊ नये; यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सर्वतोपरी खबरदारी बाळगण्यात आली आहे,

पोलिस असल्‍याने शुकशुकाट

बाजार भरवल्या जाणाऱ्या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे सकाळपासूनच पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी वेळोवेळी पाहणी करण्यासाठी पोहचत असल्यामुळे आज परिसरामध्ये जनावरांचा बाजार भरवणारे पोहोचले नसल्यामुळे शुकशुकाट बघावयास मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com