Nashik: वन कर्मचाऱ्यांचा मुलगाच मुख्‍य सुत्रधार; बिबट्याची कातडी, निलगाय शिंग तस्‍करी प्रकरण

वन कर्मचाऱ्यांचा मुलगाच मुख्‍य सुत्रधार; बिबट्याची कातडी, निलगाय शिंग तस्‍करी प्रकरण
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

तरबेज शेख

नाशिक : बिबट्याच्या कातडीसह चिंगारा व निलगायीच्या शिंग तस्करी प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये (Student) वन कर्मचाऱ्यांचा मुलगाच मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तर याप्रकरणी व कर्मचाऱ्यांची देखील खाते अंतर्गत चौकशी होणार आहे. अटक केलेले तिघही तरुणांची रवानगी नाशिक (Nashik) मध्यवर्ती कारागृहात झाली आहे. (Nashik Today News)

Nashik News
Gold- Silver: पितृपक्ष संपताच सुवर्ण खरेदीला झळाळी; दसऱ्याला अधिक उलाढालीची शक्‍यता

वन कार्यालयातील वॉचमनचा मुलगा संशयित जॉन सुनील लोखंडे (वय २९, रा. वन वसाहत) याचीही रवानगी कारागृहात झाली आहे. आठ दिवसांच्या तपासात वन पथकाने बरेच मुद्दे संकलित केले असले, तरी चोरीची ही कातडी आणली कुठून याची उकल झालेली नाही. गंभीर बाब म्हणजे, वन कार्यालयाच्या वॉचमनचा मुलगा मुख्य सूत्रधार असूनही मूळ कारण अस्पष्ट आहे. अवघ्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातून तीन टोळ्यांना (Leopard) बिबट्याच्या कातडीची तस्करीत अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. संशयित लोखंडेसह सिद्धांत मनोज पाटील (वय २१, रा. सर्वेश्वर कॉलनी, कॉलेजरोड) आणि रोहित एकनाथ आव्हाड (वय १९, रा. सातपूर) यांना या प्रकरणी अटक झाली.

संशयित लोखंडेच्या वडिलांचीही वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे चौकशी झाल्याचे समजते. पण, त्यातूनही महत्त्वाचे धागेदोरे पथकाच्या हाती लागलेले नाहीत. लोखंडेचे वकिलीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. इतर दोघांपैकी एक जण फार्मसी, तर दुसरा बीएस्सीचे शिक्षण घेत आहे. या तिघांच्या इतर साथीदारांचेही जबाब नोंदवण्यात आले. त्यापैकी काहींना तस्करीबाबत कल्पनाही नव्हती, अशी माहिती पुढे आली. मात्र, आता तिघांचीही रवानगी कारागृहात झाल्याने पुढील तपासाची दिशा काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com