Latur Latest Marathi News, Latur News in Marathi दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे- पालकमंत्री

जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी भेट देत आपदग्रस्तांना मदत करावी

दीपक क्षीरसागर

लातूर: लातूर (Latur) जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी व परिसरात अवकाळी वादळी पाऊस (rain)होऊन फळबागा, भाजीपाला आणि घरे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन, आपदग्रस्तांना मदत करावी, दिलासा द्यावा. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश लातूर जिल्ह्याचे (district) पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे. (Latur Latest Marathi News)

हे देखील पाहा-

निलंग्याच्या उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी पाहणी केली आहे. औराद शहाजानी, हालसी, तगरखेडा इतर काही ठिकाणी अवकाळी वादळी वारे आणि पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. आंबा तसेच इतर फळबागांचे नुकसान झाले आहे. भाजीपाल्याच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विजेचे खांब वाकल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडून मालमत्तेचे नुकसान झाल्यासंबंधीची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

जिल्ह्यात आणखी कुठे, अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यासंबंधी माहिती घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी मदत पथके पाठवावीत. आपदग्रस्तांना मदत करावी व दिलासा देण्यात यावा. त्याचबरोबर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून, शासनाकडे अहवाल सादर करावा. महावितरणने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवावी असेही निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले आहे. त्यानुसार निलंग्याच्या उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी या भागाची पाहणी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: सॉरी मम्मी-पापा! ३ सख्ख्या बहिणींची आत्महत्या, मध्यरात्री ९ व्या मजल्यावरून मारल्या उड्या, कारण वाचून शॉक बसेल

Rosemary Oil For Hair: लांब आणि दाट केसांसाठी लावा रोझमेरी तेल, आठवडाभरातच दिसेल फरक

Lagnanantar Hoilach Prem : "लग्नानंतरचे प्रेम दिसेल..."; जीवा-नंदिनी अन् काव्या-पार्थच्या नात्याची होणार नवीन सुरुवात, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिला तडका फडकी राजीनामा

NCP : अजितदादांच्या विश्वासू जिल्हाध्यक्षांचं अल्पशा आजाराने निधन, राष्ट्रवादीवर शोककळा

SCROLL FOR NEXT