Parbhani News saam tv
ऍग्रो वन

Lemon Price Drops : लिंबाच्या दरात मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

आता हिवाळ्याला सुरुवात झाल्याने लिंबूला मागणी कमी असल्याचे चित्र परभणी शहरात आहे.

राजेश काटकर

Parbhani News : एकीकडे भाजीपाल्याचे दर वधारले आहेत तर दुसरीकडे लिंबूचा दर घसरल्याचे चित्र परभणीच्या बाजारपेठेत दिसून येत आहे. लिंबू विक्रेत्यांकडून 40 रुपये प्रति किलो या दराने लिंबाची विक्री केली जात आहे. लिंबाचा दर घसरल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. (Maharashtra News)

आता हिवाळा सुरु झाल्याने लिंबूचा दर पडल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातून माेठ्या प्रमाणात लिंबूची परभणी शहरात आवक वाढली आहे. काही महिन्यापूर्वी लिंबाचे दर परभणीच्या बाजारपेठेत 60 रुपये किलो होते. यामध्ये आता वीस रुपयांची घसरण झाली आहे.

ग्राहकांना दहा रुपयांत कटोराभर (आठ ते दहा लिंबू) तसेच 40 रुपये प्रति किलो या दराने लिंबू मिळू लागले आहे. दरम्यान परभणीच्या बाजारपेठेत उन्हाळ्यामध्ये लिंबाचा दर प्रति किलो दोनशे रुपये असताे.

हिवाळा असल्याने कमी दरात विक्री हाेत असल्याची माहिती गांधी पार्क, क्रांती चौक, कडबी मंडी सोबतच काळी कमान परिसरातील विक्रेत्यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: परळीचा निकाल घोषित करु नये- औरंगाबाद खंडापीठात याचिका

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT