PM Kisan Samman 12th Installment : केंद्रातील मोदी सरकारने (Pm Narendra Modi) शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी किसान सन्मान योजनेची (PM Kisan Yojana) सुरूवात केली. योजनेचे आतापर्यंत 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता 12वा हप्ता कधी जमा होईल याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, 12 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. (PM Kisan Latest News)
पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत करते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. दरम्यान प्रधानमंत्री किसान योजनेचा 11वा जून महिन्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. आता शेतकरी 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे.
PM किसानचा 12 वा हप्ता कधी मिळणार?
पीएम किसान किसानचा 12 वा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्या जाण्याची शक्यता आहे. सामान्यतः या योजनेचा कालावधी एप्रिल ते जुलै, दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा डिसेंबर ते मार्च दरम्यान असतो. या महिन्याच्या अखेरीस दीपावलीचा उत्सव देखील आहे. शेतकऱ्यांची दीपावली गोड करण्यासाठी मोदी सरकार योजनेचा 12 वा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस जमा करू शकते. (PM Kisan Samman Nidhi)
शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे
दरम्यान, 12वा हप्ता जमा करण्यापूर्वी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे. आतापर्यंत 80 टक्के शेतकऱ्यांनी आपलं केवायसी पूर्ण केलं आहे. अजूनही काही शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केलं नाही त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
ई-केवायसी कसे करावे?
- सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
- येथे तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल, जिथे E-KYC टॅबवर क्लिक करा.
- आता एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च टॅबवर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरील क्रमांकावर OTP पाठवला जाईल.
- सबमिट OTP वर क्लिक करा.
- आधार नोंदणीकृत मोबाइल ओटीपी प्रविष्ट करा आणि तुमचे ई-केवायसी केले जाईल
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.