junnar hapus  
ऍग्रो वन

देवगड, रत्नागिरी हापूस ला टक्कर द्यायला ‘जुन्नर हापूस` मुंबई बाजार पेठेत दाखल

मंगेश गाडे

पुणे : मे महिन्याच्या अखेर काेकणातील हापूसचा हंगाम संपल्यानंतर पुढे महिनाभर ग्राहकांच्या जिभेवर हापूसची चव रेंगाळण्यासाठी ‘जुन्नर हापूस` Junnar Hapus मुंबई Mumbai  बाजारपेठेत Market दाखल होतो. देवगड, रत्नागिरी हापूसबराेबरच मुंबई बाजार पेठेत ‘जुन्नर हापूस`हा सुद्धा प्रसिद्ध Famous आहे. 'Junnar Hapus' Enters Mumbai Market To Fight Devgad, Ratnagiri Hapus

कोकणातील आंब्याप्रमाणे जुन्नर, आंबेगाव परिसरातील आंब्याचीही सर्वदूर ख्याती आहे. प्रदूषणमुक्त वातावरणामुळे या परिसरातील आंब्याला Mango असलेली वेगळी चव, आकार, रंग-रूप,एक वेगळाच सुगंध आहे.या मुळे या जुन्नर हापूसला विशेष ग्राहक Special Customer वर्ग Class तयार झाला आहे. 

हे देखील पहा -

साधारण फेब्रुवारीनंतर तळ काेकणातून मुंबई, पुणे बाजार समितीमध्ये हापूस आंब्याच्या आवकेला सुरवात हाेते. टप्प्याटप्प्याने आंब्याचा हंगाम बहरत आल्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस काेकणातील हापूसचा हंगाम संपताे. त्यानंतर मुंबई बाजार समितीमध्ये दाखल होतो ‘जुन्नर हापूस'. कोकणातील हापूसच्या तोडीस तोड अशी  चव या आंब्याला आहे. 

जुन्नर तालुक्याच्या पश्‍चिम  सह्याद्रीच्या डाेंगराळ भागात कुसुर, काटेडे, येणेरे, काले, निरगुडे, बेलसर, शिंदे, राळेगण, बाेतार्डे, आपटाळे, माणिकडाेह आदी परिसरात १०० ते १५० वर्षांपासून मोठयाप्रमाणात आंब्याच्या बागा आहेत. काेकण प्रदेशा सारखेच वातावरण असल्याने आंबा कलमे चांगल्या पद्धतीने इथे रुजली व जुन्नर पट्ट्यात आंबा बागा बहरल्या. 'Junnar Hapus' Enters Mumbai Market To Fight Devgad, Ratnagiri Hapus

काही वर्षांनंतर या ठिकाणचा आंबा मुंबई बाजारात दाखल हाेऊ लागला. काेकणातील हापूसचा हंगाम संपल्यानंतर,त्या चवीच्या तोडीच्या या हापूस आंब्याला देखील ग्राहकांची पसंती मिळाली. यातूनच ‘जुन्नर हापूस` ही विशेष ओळख तयार झाली.

मुंबई मार्केटमध्ये काेकण, गुजरातमधून येणाऱ्या हापूसचा हंगाम संपल्यावर जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जुन्नरचा हापूस दाखल होऊ लागतो.काेकणचा हंगाम संपला, तरी हा आंबा काेणता? अशी विचारणा ग्राहकांकडुन होते. जूनचा पहिला आठवडा ते तिसरा आठवड्यापर्यंत जुन्नर हापूसच्या विक्रीचा हंगाम असतो.

कोकणात काही आंबा बागायतदार आंबा उत्पादनासाठी क्लटार, पॅक्लोब्युट्राझोल, तसेच विविध कीडनाशकांचा वापर वाढला आहे. काही वेळा अपरिपक्व फळे विक्रीसाठी पाठविली जातात. त्यामुळे दर्जा घसरतो, दरही कमी मिळतो. मात्र जुन्नर परिसरातील हापूसच्या बागांचे स्वतः शेतकरी व्यवस्थापन करत असतात. रसायनांच्या कमीत कमी वापराने फळांचा दर्जादेखील चांगला मिळतो. त्यामुळे जुन्नर हापूस ग्राहकांच्या पसंतीत उतरला आहे. 'Junnar Hapus' Enters Mumbai Market To Fight Devgad, Ratnagiri Hapus

काेकणचा हंगाम संपल्यावर जुन्नर हापूसला पहिल्या टप्प्यात प्रतिडझन साधारण ४०० ते १८०० रुपये ही दर मिळतो. गुजरात, देवगड, रत्नागिरीबराेबर ‘जुन्नर हापूस`ला वेगळी चव व एक वेगळाच सुगंध असल्याने ग्राहकांकडून खास मागणी वाढते आहे. त्यामुळे मुंबई बाजारपेठेत देवगड, रत्नागिरीप्रमाणे जुन्नर हापूस हा अल्पावधीत एक ब्रॅंड तयार झाला आहे, यास ग्राहकांची पसंती मिळाली आहे.

मुघल बादशहा औरंगजेब याला सुद्धा इथल्या आंब्याच्या चवीची भुरळ पडली होती, याने शिवनेरी जवळ असणाऱ्या येणेरे गावात ३५० हापुसची झाडे लावल्याचीही नोंद आहे, त्याची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी शिवनेरी किल्लेदार व जुन्नर परगण्याचा वाकेनविस इमाम अली याला दिली होती,१६ मार्च १७३० सालच्या पत्रात याचा उल्लेख आढळतो. 

जुन्नर हापूसची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी भाैगाेलिक निर्देशांक घेण्यासाठी व जुन्नर हापूस ला जीआय मानांकन मिळवण्यासाठी येथील आंबा उत्पादक शेतकरी व शास्त्रज्ञ संतोष सहाणे प्रयत्नशील आहे.

Edited By : Krushna Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT