लक्ष्मण सोळुंके
जालना: गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध,त्यातच अतिवृष्टी सारखे आस्मानी संकट परिस्थितीत ही पारंपारिक शेतीबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम कोषाच्या माध्यमातून तब्बल एक कोटी १८ कोटी १५ लाख रुपयांची उत्पन्न शेतकऱ्यांनी मिळवलंय. लॉकडाऊन, निर्बंध आणि त्यांतच अतिवृष्टीच्या दृष्ट चक्रात सापडलेल्या बळीराज्याला रेशीम कोषाच्या माध्यमातून काही प्रमाणात आर्थिक उभारी मिळताना दिसत आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गत वर्षी लॉकडाऊन काळात व उन्हाळ्यातील एप्रिल आणि मे महिन्यात रेशीम किटकांचे संगोपन करून कोष विक्रीतून जिल्ह्यातील १३९ शेतकऱ्यानी ३० हजार ४५० अंडीपुंजाचे संगोपन करून त्या पासून १७.४२ टन रेशीम कोषांची निर्मिती करून १ कोटी १३ लाखाची उलाढाल केली होती.
गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्यातील रेशीम बाजारात रेशीम कोषाने चांगलाच भाव झाल्याने आत्ता पर्यंत सर्वात उच्चांक असलेला ९००० ते ९,५०० रुपये किलो दर रेशीम कोषाला या आठवड्यात मिळलाय. बाजारात काल (१६ फेब्रुवारी) रोजी रेशीम कोशांना सर्वात उच्चांकी म्हणजे ९० हजार ५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. त्यामुळे रेशीम बाजार पेठ सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत मिळालेला हा सर्वात जास्त दर असल्याचं मानलं जात आहे. या आर्थिक वर्षातील सर्वात जास्त दर मिळल्याने शेतकऱ्यानी बाजरात ३८५ टन रेशीम कोष निर्मिती करून विक्री केल्याने शेतकऱ्यांना १८ कोटी १५ लाख रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळले आहे.
हे देखील पहा-
आस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना त्यांतच कोरोना महामारी मुळे लावण्यात आलेले निर्बंध या आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना रेशीम कोषाच्या निर्मितीतून थोडा का होईना दिलासा मिळायला सुरवात झालीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.