जालन्याला अतिवृष्टीचा फटका! सव्वा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली
जालन्याला अतिवृष्टीचा फटका! सव्वा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली Saam Tv
ऍग्रो वन

जालन्याला अतिवृष्टीचा फटका! सव्वा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली

लक्ष्मण सोळुंके

जालना जिह्यात (Jalna District) गेल्या दहा दिवसापैकी सहा दिवस अतिवृष्टी झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे, त्यातच मंगळवारी १५ मंडळात अतिवृष्टी झाल्याने महिन्या-दोन महिन्यात काढणीला आलेले पिकं जमीनदोस्त झाल्याने आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी या अस्मानी संकटाकुळे हवालदिल झाला आहे. तर खरडुन गेलेल्या जमिनी नीट करायच्या कशा अशा प्रश्न ? आता बळीराराजा सामोर उभा ठाकला आहे, दुसरीकडे सर्वत्र पाऊस झाल्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने भूजलपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे, त्यामुळे रब्बी पिकांना यांचा मोठा फायदा होणार असला तरी खरिपाच्या पिकांची मात्र दाणादाण झाल्याने बळीराजा अजून अर्थिक संकटात सापडला आहे.

जिल्ह्यात गेल्या सहा दिवसात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका २६३ गावातील सव्वा लाख हेक्टरवरील पिकांना बसला आहे, अनेक ठिकाणी पीक पाण्याखाली गेल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांचे प्रचंड नुकसान होवून पिकांची नासाडी झाली आहे. अंबड, घनसावंगी, आणि जालना तालुक्यात शेतात कमरे इतके पाणी साचल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. लाखो हेक्टर वरील जमिनी खरडुन गेल्याने या जमिनी नीट करायच्या कशा असा प्रश्न आत्ता शेतकऱ्या सामोर उभा टाकला आहे. जिल्ह्यात झालेल्या या मुसळधार अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका मुक्या जणांवराना आणि पक्षांना बसला आहे, जिल्ह्यात या अतिवृष्टीमुळे १३८ मुक्या जनावरांचा तर २२२ कोंबड्या दगावल्या आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले आहे. तर विविध भागात झालेल्या या अतिवृष्टीमुळे २१५ घराची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्या वर पडले आहे. तर परतूर तालुक्यात बामणी गावात ओढ्याला आलेल्या पुरात एकाच मृत्यू झाला आहे. तर दोघांना वाचवण्यात यश आले आहे.

जिल्ह्यात सहा दिवस झालेल्या या अतिवृष्टीमुळे जुई, धामना, निम्न दुधना, गलाटी या सारखे प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहे. जिल्ह्यात असलेल्या ७ मध्यम प्रकल्प आणि ५७ लघु प्रकल्पा पैकी ३ मध्यम प्रकल्पात ७५ टक्के पेक्षा कमी जलसाठा तर ४ प्रकल्पात ७५ टक्के पेक्षा अधिक जलसाठी आहे. तर ५७ लघु प्रकल्पा पैकी १४ प्रकल्पात ७५ टक्के पेक्षा कमी तर ३९ लघु प्रकल्पात ७५ टक्के पेक्षा अधिक जलसाठा आला आहे. ४ लघु प्रकल्पाचा जलसाठा हा अजून ही जोत्याखाली आहे. मात्र दरम्यान सततच्या पावसामुळे या पकल्पात ही पाण्याची आवक सुरू असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. रब्बी पिकांना यांचा मोठा फायदा होणार असला तरी खरिपाच्या पिकांची मात्र दाणादाण झाल्याने बळीराजा अजून अर्थिक संकटात सापडला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UP Accident CCTV: ई-रिक्षाचालकाच्या निष्काळजीपणाने घेतला तरुणाचा जीव, अपघाताचा धक्कादायक CCTV व्हिडीओ व्हायरल

Today's Marathi News Live: जाहीर सभेत आमदार शहाजी बापू पाटलांची मतदारांना दमबाजी

Aaditya Thackeray Speech : 'कोल्हापुरात किती दिवस ठाण मांडणार?'; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेना खोचक सवाल

Unnao Accident: उन्नावमध्ये बस -ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू

Kalyan News : श्री शंकर महाराज मंदिरातील दानपेटी चोरीला; हातात शस्त्र घेतलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT