Manasvi Choudhary
आमदार आदिती तटकरे या नेहमीच चर्चेत असतात. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे.
आदिती तटकरेंचा जन्म १६ मार्च १९८८ रोजी झाला. आदिती तटकरे या सध्या ३७ वर्षांच्या आहेत.
आदिती तटकरे या सुनील तटकरे यांची मुलगी आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आदिती यांचा राजकरणात सक्रिय सहभाग आहे.
आदिती या सध्या महिला व बालविकास मंत्रीदेखील आहेत.
आदिती तटकरे या महायुती सरकारमधील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आहेत.
आदिती तटकरे यांनी एम.ए पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.