Crop Loan
Crop Loan Saam tv
ऍग्रो वन

रब्बीत केवळ ११ टक्के कर्ज वाटप; राष्ट्रीयकृत बँकांची पीककर्ज वाटपासाठी उदासीनता

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना जिल्ह्यासह मराठवड्यात अतिवृष्टीमुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी वेळेवर पीककर्जाचे (Crop Loan) वाटप करणे गरजेचे होते. परंतु, बँकांकडून हेतूपुरस्कर टाळाटाळ केली जात असल्याने शेतकऱ्यांनी (Farmer) रब्बी हंगामाची पेरणी करायची कशी? अशा प्रश्न निर्माण झाला आहे. (Breaking Marathi News)

जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घसा निसर्गाच्या या लहरीपणामुळे हिरावल गेला आहे. त्यातच सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे अद्याप शेतकऱ्यांच्या हातात नुकसान भरपाईची छदामसुद्धा मिळाला नाही. अशात रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांवर आता राष्ट्रीयकृत (Bank) बँकांचे उंबरठे झिझवण्याची वेळ आली आहे. बँकांकडूनही आता शेतकऱ्यांना उडवाउडावीची उत्तरे मिळताना पहायला मिळत आहे.

केवळ ५४ कोटींचे कर्ज वाटप

जिल्ह्यात राष्ट्रीयकृत यंदा रब्बीसाठी बँकांना ४८० कोटी १२ लाखांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना बँकांनी रब्बीसाठी आजवर ४ हजार ६५० शेतकऱ्यांना फक्त ५४ कोटी ७४ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. ही आकडेवारी पाहता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम बँका करीत करत आहे का? असा प्रश्न अत्ता शेतकरी उपस्‍थीत करत आहेत.

असे झालेय कर्ज वाटप

बँक ऑफ बडोदा- ७९ शेतकऱ्यांना ९१ लाख रूपये, बँक ऑफ इंडिया: ५६ शेतकऱ्यांना ५४ लाख रूपये, बँक ऑफ महाराष्ट्र- ५९५ शेतकऱ्यांना ५ कोटी २७ लाख रूपये, कॅनरा बँक- ३४३ शेतकऱ्यांना ३ कोटी ८० लाख रूपये, सेंट्रल बँक ऑफ इंडिया- ३६ शेतकऱ्यांना ४० लाख रूपये, इंडियन बँक- २९ शेतकऱ्यांना ४६ लाख रूपये, इंडियन ओव्हरसिस बँक- ३६ शेतकऱ्यांना ३९ लाख रूपये, पंजाब नॅशनल बँक- ३ शेतकऱ्यांना ३ लाख रूपये, स्टेट बँक ऑफ इंडिया- २४०० शेतकऱ्यांना ३१ कोटी ३० हजार रूपये, युको बँक- १२ शेतकऱ्यांना १६.१३ लाख रूपये कर्ज दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Thackeray Group : ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात!

Ghee Benefits: रोज एक चमचा तूप खा अन् आरोग्याच्या समस्या दूर करा

Maharashtra Lok Sabha Voting Live: ओशिवारामध्ये भाजप-ठाकरे गट आमने-सामने

Control Sugar Level : सकाळी उठल्यावर शुगर वाढतेय; रात्री झोपण्याआधी 'ही' कामे करा डायबिटीज कंट्रोलमध्ये राहिल

Electric Shock : थंड पाणी भरताना वॉटर कुलरमधून विजेचा धक्का; तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT