Farmer: सततची नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सततची नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
Buldhana Farmer News
Buldhana Farmer NewsSaam tv

बुलढाणा : शेतात पिकांसाठी केलेला खर्च तरीही अपेक्षीत उत्‍पन्‍न मिळाले नाही. शिवाय शेतीच्‍या खर्चासाठी उचलेल्‍या कर्जाची फेड कशी करायची; या विवंचनेतून भादोला येथील शेतकऱ्याने (Farmer) आत्‍महत्‍या केल्‍याचे समोर आले आहे. (Letest Marathi News)

Buldhana Farmer News
अफजल खान कबरीचे अतिक्रमण हटवलं; साताराला येतोय.. उद्या भेटू, भाजपचा माेठा नेता उदयनराजेंच्या भेटीला

जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने (Heavy Rain) धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला. या कारणामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बुलडाणा (Buldhana) तालुक्यातील भादोला येथील शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तेजराव मोतीराम भगत (वय ५५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पावणे तीन लाख रुपयांचे कर्ज

तेजराव भगत हे अल्पभूधारक शेतकरी होते. भादोला शिवारात त्यांच्याकडे एक एकर शेती होती. त्यांच्यावर जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे पावणे तीन लाख रुपयांचे कर्ज होते. सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडीची चिंता त्यांना होती. त्या विवंचनेत त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com