Ginger Price Saam tv
ऍग्रो वन

Ginger Price : अद्रकच्या दरात घसरण; लागवडीचा खर्चही निघेना, उत्पादक शेतकरी अडचणीत

Jalna News : जालन्यातील जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यातील अनेक शेतकरी अद्रकची शेती करतात. मागील वर्षी अद्रकला चांगला दर मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी यंदा महागडे बियाणे आणत अद्रकची लागवड केली होती

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: अद्रक काढणीला सुरवात झाली असल्याने उत्पादक शेतकरी अद्रक विक्रीसाठी मार्केटमधे आणत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून अद्रकच्या दरात मोठी घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे लागवडीसह उपदासासाठी लावलेल्या खर्च देखील निघणे कठीण झाले आहे. परिणामी अद्रक उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. 

जालन्यातील जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यातील अनेक शेतकरी अद्रकची शेती करतात. मागील वर्षी अद्रकला चांगला दर मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी यंदा महागडे बियाणे आणत अद्रकची लागवड केली होती. आता काढणीला सुरवात झाली असून मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाली आहे. आवक सुरु झाल्यानंतर दरात घसरण होण्यास सुरवात झाली आहे. 

प्रति क्विंटल दोन हजार रुपये भाव 

यावर्षी बाजारपेठेमध्ये अद्रकला दोन हजार रुपये भाव मिळत असल्याने अद्रक उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अद्रकच्या लागवडीचा खर्चही उत्पादनातून निघत नसल्याने अद्रक उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरम्यान अद्रकला हमीभाव देण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.

वाशिममध्ये पपईच्या दरात वाढ

वाशीम : काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यात पपईचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. पपईचा दर ५ ते ६ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला होता. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती. मात्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील हवामानातील बदलांमुळे वाशिममधील पपईसाठी व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. याचा थेट परिणाम पपईच्या दरांवर झाला असून, सध्या पपई ९ ते १० रुपये प्रति किलोच्या दराने विकली जात आहे. मागणीतील वाढ आणि चांगला दर मिळत असल्याने पपई उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT