Akola News : आई रागावल्याने मुलीने उचलले टोकाचे पाऊल; स्कुटी रस्त्यावर लावत मारली विहरीत उडी

Akola : अकोल्यातल्या मुर्तीजापुर तालुक्यातल्या ग्राम शिरपूर- शिरसो रस्त्यावर एका शेतातील विहिरीत या तरुणीचा मृतदेह आढळून आला. नम्रता विनोद गरदे (वय २१) असं या आत्महत्या केलेल्या तरुणीच नाव आहे
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : अकोल्यातल्या २१ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली असता रस्त्यातच मुलीने आपली गाडी उभी केली. यानंतर तिने विहरीत उडी मारून जीवन संपविले. आईने सकाळी रागावल्यातून मुलीने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी अधिक तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करत आहेत.

अकोल्यातल्या मुर्तीजापुर तालुक्यातल्या ग्राम शिरपूर- शिरसो रस्त्यावर एका शेतातील विहिरीत या तरुणीचा मृतदेह आढळून आला. नम्रता विनोद गरदे (वय २१) असं या आत्महत्या केलेल्या तरुणीच नाव आहे. मुर्तीजापुर गावातील विनोद गरदे आणि कांचन गरदे यांची नम्रता ही मुलगी असून एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी होती. 

Akola News
Pune Crime : एटीएमची अदलाबदल करून लुबाडणूक; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

घरी न परतल्याने शोधाशोध 

नम्रता रोजप्रमाणे हॉस्पिटलमध्ये कामावर गेली होती. मात्र रात्री ९ वाजल्यानंतर देखील ती घरी परतली नाही. यामुळे तिच्या आईने शोध सुरू केला. तिने भाऊ सतीश भगत यांच्याशी फोनवरुन संपर्क साधत नम्रता तुमच्याकडे आली का? म्हणून विचारणा केली. मात्र नम्रता तेथेही नव्हती. मैत्रिणीकडे शोध घेतला असता कुटुंबीयांना तिचा सुगावा लागला नाही. दरम्यान सकाळी तिला आईनं रागावल्याचेही भावाला सांगितले होते. ती नाराज झाली असेल आणि मैत्रिणीकडे गेली असेल असे कुटूंबियांना वाटले. 

Akola News
Samruddhi Mahamarg Accident : भीषण अपघात; चालकाला डुलकी लागल्याने कार ट्रकवर आदळली, एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

विहिरीजवळ होती बॅग 

याचा दरम्यान नम्रताची स्कुटी हिरपूर- सिरसो रस्त्यावरील त्यांच्या शेताजवळ उभी असल्याची माहिती पुढे आली होती. तर शेतातील विहिरीच्या काठावर एक बॅग देखील ठेवल्याचे दिसून आले. याठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेतली. विहिरीत मुलीचा मृतदेह दिसल्यानंतर बाहेर काढण्यात आला. कपडे व पायातील बुटावरुन मृतदेह नम्रता गरदे हिचा असल्याची खात्री पटली. त्यानंतर उपस्थित लोकांच्या सहकार्याने पोलिसांनी तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com