Partur Heavy Rain Saam tv
ऍग्रो वन

Partur Heavy Rain: एक एकरातील कोथिंबीर पाण्याखाली; अवकाळी पावसाने शेतकऱ्याला लाखो रुपयाचा फटका

Jalna News : जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला. या पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली. पाटोदा माव गावातील शेतकरी नाथाजी खवल यांची तब्बल एक एकर कोथिंबीर पिक पाण्यात गेले

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: अवकाळी पाऊस सर्वदूर कोसळत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. यातच जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडला असून या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यामध्ये विक्रीला आलेली एक एकर क्षेत्रातील कोथिंबीर पाण्याखाली गेली आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला. या पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली आहे. दरम्यान पाटोदा माव गावातील शेतकरी नाथाजी खवल यांची तब्बल एक एकर कोथिंबीर पिक पाण्यात गेले. विक्रीला आलेली कोथंबीर पावसामुळे पाण्यात गेल्याने या शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

ड्रॅगनफ्रुट बागेची पावसाने केले नुकसान

सोलापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाचा बागायत शेतीला मोठा फटका बसला आहे. तर बार्शी तालुक्यातील सौंदरे गावातील ड्रॅगनफ्रुट बागेची पावसाने नुकसान केले आहे. अति पावसामुळे ड्रॅगन फ्रुटच्या झाडाची पाने पिवळी पडली आहेत. यामुळे साधारण पाच एकर बागेतील ७०० ड्रॅगन फ्रुटच्या झाडावर पावसाचा परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. अर्थात कमी पाण्यात येणार पिक म्हणून ड्रॅगफ्रुट पिक आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या पावसाने ड्रॅगनफ्रुटचे भाव अर्ध्यावर आले आहेत. 

सातारा जिल्ह्यात केळीचे नुकसान 

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुमारे २ एकर क्षेत्रातील केळी पीक उद्ध्वस्त होऊन जमीन दोस्त  झाले आहे. शेतकऱ्याचे १२ लाखाहून अधिक नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाकडे त्वरित पाहणी करून आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT