Agriculture News : खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई; परवानगी नसलेले ३२० मॅट्रिक टन खत जप्त

Jalna News : खरीप हंगाम जवळ आला असून शेतकऱ्यांची बी- बियाणे तसेच खते खरेदीची लगबग सुरु झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभाग देखील अलर्ट
Jalna Agriculture News
Jalna NewsSaam tv
Published On

अक्षय शिंदे 

जालना : खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. दरम्यान या खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने मोठी कारवाई केली असून जालन्यात उत्पादनाची परवानगी नसलेल्या विनापरवाना खतावर कृषी विभागाने कारवाई करत तब्बल २० लाख रुपये किंमतीचे ३२० मॅट्रिक टन खत जप्त करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामातील हि पहिलीच कारवाई आहे. 

जालन्यातील राजूर रोडवरील गुंडेवाडी शिवारातील कृष्णा फास्केम लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनमध्ये कृषी विभागाने हि कारवाई केली आहे. दरम्यान खरीप हंगाम जवळ आला असून शेतकऱ्यांची बी- बियाणे तसेच खते खरेदीची लगबग सुरु झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभाग देखील अलर्ट असून तपासणीसाठी वेगवेगळी पथक नेमली आहेत. त्यानुसार जालन्यात परवानगी नसलेल्या खतांचा साठा जप्त करण्यात आला आहे. 

Jalna Agriculture News
Nagpur Crime : प्रियकरासाठी चोरल्या हिऱ्याच्या अंगठ्या; मोलकरणीचा कारनामा, पश्चिम बंगालमधून घेतले ताब्यात

गोडाऊनवर छापा टाकत कारवाई  

जालन्यात उत्पादनास परवानगी नसलेले विनापरवाना खत रेल्वे रॅकद्वारे वाहतूक करून कंपनीच्या गोडाऊनमध्ये साठवल्या प्रकरणी खताच्या गोडाऊनवर कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. जालन्यात गुंडेवाडी शिवारातील कृष्णा फस्केम कंपनीच्या गोडाऊनवर कृषी विभागाने ही मोठी कारवाई केली असून या कारवाईत फॉस्फोजिप्सम पाउडर नावाचे तब्बल २० लाखांच ३२० मॅट्रिक टन खत कृषी विभागाने जप्त केल आहे. 

Jalna Agriculture News
Ashti Heavy Rain : आष्टी तालुक्यात धुवाधार पाऊस; सीना नदीच्या पुराचे पाणी शिरले गावात, शेती पिकाचे मोठे नुकसान

पोलिसात गुन्हा दाखल 

खरीप हंगामाच्या तोंडावर जालना कृषी विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. यंदाच्या हंगामातील हि पहिलीच कारवाई आहे. दरम्यान जिल्ह्यात परवानगी नसलेल्या खतांची गोडाऊनमध्ये साठवणूक केल्या प्रकरणी जालनाच्या चंदनझीरा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com