Mosambi Farm Saam tv
ऍग्रो वन

Mosambi Farm : पाण्याअभावी मोसंबीच्या बागा सुकल्या; अंबड तालुक्यात बागांवर शेतकऱ्यांनी चालविला जेसीबी

Jalna News : जालना जिल्ह्यातील नागरिकांना एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहे. विहिरीने तळ गाठला असून याचा थेट परिणाम मोसंबी उत्पादक शेतकऱ्यावर होताना पाहायला मिळत आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: एप्रिल महिन्यात पाण्याची समस्या जाणविण्यास सुरवात झाली आहे. पाणी नसल्याने शेतकऱ्यांसमोर पिकांना पाणी देण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच पाण्याअभावी मोसंबीच्या बागा सुकू लागल्या आहेत. यामुळे जालन्यातील अंबड तालुक्यातील शिरढोण गावामध्ये अनेक शेतकऱ्यांनी मोसंबी बागांवर जेसीबी चालवताना पाहायला मिळत आहे. यात मोठे नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे. 

जालना जिल्ह्यातील नागरिकांना एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहे. विहिरीने तळ गाठला असून याचा थेट परिणाम मोसंबी उत्पादक शेतकऱ्यावर होताना पाहायला मिळत आहे. जालन्यातील शिराढोण गावातील शेतकरी बाबुराव गाडेकर यांनी मोसंबीच्या झाडावर पाण्याअभावी जेसीबी चालवली आहे. तसंच गावातील विहिरींनी तळ गाठल्यामुळे अनेक शेतकरी मोसंबी बागांवर जेसीबी फिरवण्याच्या तयारीत आहेत. 

२०० मोसंबीच्या झाडावर फिरवला जेसीबी
बाबुराव गाडेकर यांनी सुमारे २०० झाडांवर जेसीबी फिरविला आहे. सात वर्षांपासून जिवापाड जपलेली बाग तोडताना खुप दुःख झाले. खडकाळ जमीन असून विहीरीची खोली जास्त घेता येत नाही. खाली माजर्या, पाषाण खडक लागतो. गावाशेजारी तळे आहे. परंतु ते भरले नाही. त्यामुळे फळबागा जगविणे कठिण झाले आहे. त्यामुळे नाईलाजाने मोसंबी बागांवर जेसीबी चालवावा लागत असल्याची भावना शेतकरी गाडेकर यांनी व्यक्त केली. 

गावातील अनेक शेतकऱ्यांपुढे संकट 
अंबड तालुक्यातील शिराढोण येथील विहीरीच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होत आहे. आज गावातील गाडेकर या शेतकऱ्याने २०० मोसंबीच्या झाडांवर जेसीबी चालवला आहे. तसेच गावातील पाणीपातळीत घट झाल्याने अनेक शेतकरी मोसंबीच्या बागांवर जेसीबी फिरवण्याच्या तयारीत आहेत. यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT