Badlapur Palika : नगरपालिकेच्या भूखंडावरील ५ गाळे जमीनदोस्त; बदलापूर नगरपालिकेची धडक कारवाई

Badlapur News : बदलापूर नगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या महिलाभारापासुन हि कारवाई करण्यात येत आहे. मागील महिन्यात फुटपाथ वरील टपऱ्या तसेच हातगाड्या उध्वस्त करण्यात आल्या
Badlapur Palika
Badlapur PalikaSaam tv
Published On

मयुरेश कडव 
बदलापूर
: अनधिकृतपणे बांधकाम किंवा पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात बदलापूर नगरपालिकेने धडक कारवाई करण्यात आली. त्यानुसार बदलापूर नगरपालिका हद्दीतील कात्रप परिसरात खुल्या भूखंडावर अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ५ गाळे जमीनदोस्त करण्यात आले आहे. मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीत दुपारी या गाळ्यांवर कारवाई करण्यात आली.

बदलापूर नगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या महिलाभारापासुन हि कारवाई करण्यात येत आहे. मागील महिन्यात फुटपाथ वरील टपऱ्या तसेच हातगाड्या उध्वस्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईनंतर आता नगरपालिकेनं शासकीय जमिनींवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आज काही भागात मोहीम राबविण्यात आली आहे. 

Badlapur Palika
Bhandara : डॉक्टरांनी १४ इंजेक्शन देण्याचे म्हणताच सत्य आले समोर; शासकीय अनुदानासाठी शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्याचा बनाव

भूखंडावरील गाळे जमीनदोस्त 

नगरपालिकेच्या या मोहिमेअंतर्गत नगरपालिकांच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यात आले आहे. यात काही ठिकाणी पालिकेच्या खुल्या भूखंडांवर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. अशाच प्रकारे बदलापूरच्या कात्रप परिसरातील जुन्या पेट्रोल पंपाजवळ नगरपालिकेच्या जागेवर बांधण्यात आलेले ५ गाळे जेसीबीच्या सहाय्यानं तोडण्यात आले. अनेक वर्षांपासून याठिकाणी हे गाळे होते. 

Badlapur Palika
Leopard : उष्माघाताने बिबट्याचा मृत्यू?; शेताच्या बांधावर आढळला मृतावस्थेत

त्याठिकाणी उभारणार संभाजी महाराजांचा पुतळा 

भूखंडावरील गाळे पाडल्यानंतर लवकरच हा भूखंड मोकळा करून याठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली. तसेच बदलापूर नगरपालिका क्षेत्रात ज्या- ज्या ठिकाणी शासकीय जमिनींवर अतिक्रमणे झाली आहेत; ती सर्व अतिक्रमणे तोडण्यात येतील असेही गायकवाड यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com