Climate change Saam tv
ऍग्रो वन

Climate change : वातावरणातील बदलाचा हरभरा, मिरचीवर रोग; हरभऱ्यावर अळी आणि मर रोगांचा प्रादुर्भाव

Jalna Nanded News : मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. वातावरण बदलाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत आहे. पिकांवर रोगराई पसरत आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे/ संजय सूर्यवंशी 

जालना/ नांदेड : मागील काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि दाट धुके दिसून येत आहे. या धुक्यामुळे हरभरा पिकावर अळी आणि मर रोगांचा प्रादुर्भाव पडला आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर नांदेड जिल्ह्यात देखील वातावरणातील होत असलेल्या बदलामुळे हिरवी मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव पडलेला पाहण्यास मिळत आहे. 

मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. वातावरण बदलाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. प्रमुखाने पिकांवर रोगराई पसरत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान २६ जानेवारीपर्यंत जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. 

ढगाळ वातावरण, धुक्याचा परिणाम 
जालना जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण त्याचबरोबर दाट धुके पसरत आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामातील हरभरा पिकावर होत असून अळी आणि मर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले असून फवारण्या करण्यात येत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे लागवड जास्त केली होती. मात्र सततच्या बदलत्या वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.

हिरव्या मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव
वातावरणात सातत्याने बदल होत आहे. वातावरणातील या बदलामुळे शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. त्याच बरोबर भाजीपाला पिकांना देखील याचा फटका बसताना दिसत आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील विनायक मुदखेडे या शेतकऱ्याने शेतात हिरव्या मिरचीची लागवड केली.

या मिरची लागवडीसाठी त्यांना एक लाख रुपये खर्च आला. एक लाख वगळता त्यांना या मिरचीच्या उत्पादनातून जवळपास तीन लाख उत्पन्न होईल अशी आशा होती. परंतु वातावरणातील बदलामुळे मिर्चीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे लागवड खर्च देखील आता निघत नसल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Ankita Walawalkar: मराठी लोकांनी अन् गावखेड्यातल्या प्रत्येकाने...; महाराष्ट्र भाऊ प्रणित मोरेला अंकिता वालावलकरचा पाठिंबा

Myra Vaikul Dance: लाल साडी अन् कपाळी मळवट, नवरात्रीनिमित्त छोट्या मायराचा 'लल्लाटी भंडार...' गाण्यावर स्पेशल डान्स, VIDEO

Central Railway: नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सीवूड्स-उरण मार्गावर २० अतिरिक्त लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT