यावल (जळगाव) : साप निदर्शनास आल्यानंतर त्याला पकडण्याचा प्रयत्न शेतमजुराने केला. मात्र सापाला पकडत असताना त्याला सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील दहिगाव येथे घडली. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यावल (Yawal) तालुक्यातील दहिगाव येथील दिलीप मोतीराम पाटील (वय ४५) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दिलीप पाटील हे दत्तनगर शेजारील मोकळ्या आवारात मका भरण्यासाठी गेलेले होते. दरम्यान दुपारच्या सुमारास विश्रांतीसाठी ते जवळच्या श्री स्वामी समर्थ बैठक हॉलमध्ये बसले होते. याचवेळी त्यांना साप दिसला. सापाला पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता, सापाने त्यांना दंश (Snake Bite) केला.
साप पकडताना कोणतेही साधन नसताना प्रयत्न करायला गेलेल्या शेतमजुराला सापाने दंश केला. यानंतर त्यांना जळगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. चावा घेणारा साप घोणस जातीचा विषारी साप होता. रुग्णालयात उपचार सुरु असताना दिलीप पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.