Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : एकाच दिवशी जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी संपविले जीवन; कर्जबाजारीपणाचे ठरले कारण

Jalgaon News : एकाच दिवशी जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी संपविले जीवन; कर्जबाजारीपणाचे ठरले कारण

Rajesh Sonwane

जळगाव : यंदा पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतीसाठी उपलब्ध केलेला पैसा, पीककर्ज डोक्यावर असल्याने कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत एकाच दिवसात दोन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. (Jalgaon) जळगाव जिल्ह्यातील चोरवड येथील २७ वर्षीय तरुण (Farmer) शेतकऱ्याने विषप्राशन केले. तर कुऱ्हा- हरदो येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याने कर्ज व दुबार पेरणीला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. (Tajya Batmya)

पारोळा : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील चोरवड येथील शेतकरी हेमराज शेखर पाटील (वय २७) यांच्याकडे पाच बिघे शेती आहे. त्यांनी कापसाची लागवड केली असून याकरिता (Parola) पीककर्जही घेतले होते. परंतु या वर्षी तालुक्यात कधी जास्त, तर कधी कमी व दीर्घकाळ खंड पडलेल्या पावसामुळे शेतात नापिकीसारखी परिस्थिती उद्‍भवली आहे. त्यामुळे पीककर्ज कसे फेडायचे, घरसंसार कसा चालवायचा, या नैराश्यातून त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास शेतात विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्यांनीच चुलत भावाला फोनवरून सांगितले. यानंतर नातेवाइकांनी धाव घेत त्यांना पारोळा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, पत्नी व दोन वर्षांची मुलगी आहे. याबाबत नितीन पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बोदवड तालुक्यातही आत्महत्या 
बोदवड : तालुक्यातील कुऱ्हा-हरोदो येथील शेतकरी शंकर कृष्णा माळी (वय ४२) यांनी कर्जाला कंटाळून घराच्या छताला गळफास घेऊन (Bodwad) आत्महत्या केली. शेतकरी शंकर माळी यांनी शेतामध्ये पेरणी केली होती. परंतु मागील काळात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने माळी यांच्या शेतातील माती वाहून गेली. त्यात पेरणी केलेले बियाणेसुद्धा वाहून गेले होते. यातून सावरत पुन्हा दुबार पेरणी केली. निसर्गाच्या भिजपाण्यामुळे माळी यांची शेती जशी पडीकच पडली. या भिजपावसाने आणि मशागतीसाठी पावसामुळे वेळ मिळाला नसल्याने शेत पडीक अवस्थेत दिसू लागले. यामुळे शेतकरी शंकर माळी यांनी पेरणीसाठी विविध कार्यकारी सोसायटीकडून एक लाख कर्ज आणि काही खासगी बचत गटाच्या कर्ज काढले होते. त्याचा बोजा डोक्यावर होता. शेतकरी माळी हे मंगळवारी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले आणि दुपारी तीनपर्यंत घरी आले आणि गळफास घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC T20 WC: सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला किती सुपर८चे किती सामने जिंकावे लागतील? समजून घ्या संपूर्ण गणित

Maharashtra Live News Update: देखभाल दुरुस्तीसाठी उद्या पिंपरी चिंचवड शहरात पाणीपुरवठा असणार बंद

Sindhudurg Tourism : रुपेरी वाळू सोनेरी लाटा...; कोकणात 'येथे' घ्या रोमांचक जलक्रीडांचा अनुभव

राज्यात राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली मंत्रिमंडळाची बैठक, VIDEO

Simple Saree Designer Blouse: साध्या साडीवर शोभून दिसतील हे ७ सुंदर आणि ट्रेंडी ब्लाऊज, पाहा लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT