Jalgaon Unseasonal Rain News Saam TV
ऍग्रो वन

Jalgaon Weather Forcast: अवकाळी पावसाचा फटका; जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यात मोठे नुकसान

Jalgaon Rain News: राज्यातील बहुतांश भागात मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. आणखी पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

Rajesh Sonwane

जळगाव : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. रोज वेगवेगळ्या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने मोठे नुकसान होत आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाचा फटका पाच तालुक्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. यात केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वादळी वाऱ्यासह अवकाळी (Rain) पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. राज्यातील बहुतांश भागात मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. आणखी पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी (Jalgaon) जळगाव जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस होऊन जिल्ह्यातील पाच तालुक्यांना अधिक फटका बसला आहे. पाच तालुक्यांतील ५८ गावांमधील १ हजार ७२० शेतकऱ्यांच्या केळी व पपई पिकांचे  नुकसान झाले आहे. 

जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, (Jamner) जामनेर, बोदवड, यावल या तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे केळीच्या बागांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाच तालुक्यांना दोन दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा दिला. जिल्ह्यातील सुमारे ५९ गावे बाधित झाली असून १ हजार ७२० हेक्टरवरील केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे. यात पपईची पिके नष्ट झाली असून एकूण १ हजार ७५० हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आपण सोबत निवडणूक लढलो...पक्षप्रवेशावरील नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, VIDEO

Maharashtra Live News Update: महाबळेश्वरमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन

Maharashtra Politics : घराणेशाहीचा रेकॉर्ड मोडला; भाजप अन् शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी

Winter Health: हिवाळ्यात दिवसभर किती लिटर पाणी प्यावे?

ऐन निवडणुकीत IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?

SCROLL FOR NEXT