Sakshi Sunil Jadhav
सध्या एकाच बाईकची जोरदारची चर्चा तरुणांमध्ये सुरु आहे. पुढे त्याच गाडीबद्दल जाणून घेणार आहोत.
तरुणांमध्ये सध्या रॉयल ईनफील्ड क्लासिक 350 विकत घेण्याच्या चर्चा सुरु आहेत. पण त्यात मुद्दा येतो पैशाचा.
पुढील बातमीत आपण सगळ्यांच्याच मनातल्या प्रश्नाबद्दल म्हणजे EMI बद्दल जाणून घेणार आहोत.
रॉयल ईनफील्ड क्लासिक 350 ही देशातील लोकप्रिय बाइक्सपैकी एक असून तिची ऑन-रोड किंमत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. मात्र ग्राहकांना ही बाइक पूर्ण रक्कम न भरता फायनान्सवर खरेदी करता येते.
भारतीय बाजारात क्लासिक 350 चे एकूण 5 व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. यामधले सर्वात स्वस्त व्हेरिएंट म्हणजे हेरिटेज एडिशन, ज्याची दिल्लीतील ऑन-रोड किंमत सुमारे 2,15,205 रुपये आहे.
BikeWale वेबसाइटनुसार, रॉयल एनफील्ड क्लासिक 350 तुम्ही दरमहा 7,383 रुपयांच्या EMI वर घरी आणू शकता, त्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी ही डील आकर्षक ठरते.
तुम्ही ही बाइक खरेदी करण्यासाठी ग्राहकांना सुमारे 11,500 रुपये डाउन पेमेंट म्हणून भरावा लागेल. उरलेली रक्कम बँक किंवा फायनान्स कंपनीकडून कर्जाच्या स्वरूपात मिळते. तर EMI तुम्हाला 2 वर्षे 5 महिने भरावा लागेल.
क्लासिक 350 साठी ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीसाठी बाइक लोन उपलब्ध आहे. कर्जाचा कालावधी आणि व्याजदरानुसार EMI मध्ये फरक पडू शकतो.
फायनान्स पर्यायामुळे रॉयल ईनफील्ड क्लासिक 350 ही स्वप्नातील बाइक आता सुलभ EMI मध्ये खरेदी करणं शक्य झाले असून तरुण ग्राहकांमध्ये या बाइकमुळे मोठी उत्सुकता दिसून येते.