Manasvi Choudhary
घरच्या घरी कुरकुरीत बोंबील फ्राय बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
बोंबील हा मासा अत्यंत मऊ असल्याने नीट फ्राय करणे महत्वाचे आहे. अस्सल मालवणी स्टाईल बोंबील फ्राय करण्याची ही पद्धत आहे.
बोंबील फ्राय बनवण्यासाठी बोंबील, आले- लसूण पेस्ट, लिंबू रस, कोकम आगळ, हळद,तांदळाचे पीठ किंवा बारीक रवा लाल मसाला, मीठ हे साहित्य घ्या
बोंबील धुवून कापल्यानंतर ते दोन ताटांच्या मध्ये ठेवून त्यावर एखादी जड वस्तू ठेवा. १५-२० मिनिटांत त्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल. यामुळे बोंबील कुरकुरीत होतात.
बोंबीलला आले-लसूण पेस्ट, लिंबू रस, तिखट, मीठ आणि हळद लावून १०-१५ मिनिटे बाजूला ठेवा.
एका ताटात तांदळाचे पीठ आणि रवा एकत्र करा. त्यात चिमूटभर मीठ आणि तिखट मिसळा.
प्रत्येक बोंबील या पिठाच्या मिश्रणात नीट घोळवून घ्या. तव्यावर तेल गरम करा. मध्यम आचेवर बोंबील दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करा.