Jalgaon News Cotton Crop
Jalgaon News Cotton Crop Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon: पिकांची वाढ खुंटली; किमान दहा दिवस हवा सूर्यप्रकाश

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९८.४ मिलिमीटर अर्थात ४७.२ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे सर्वच धरणांत समाधानकारक साठा झाला आहे. मोठ्या धरणांतून नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांतील साठ्याने जिल्ह्यातील पाणीटंचाई मिटण्याची चिन्हे आहेत. असे असताना दुसरीकडे सततच्या (Rain) पावसाने शेतातील वाफसा झालेला नाही. वाफसा होत नसल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना (Farmer) पिकांना खते देता येत नाहीत. पिकांची वाढ खुंटली आहे. किमान आठ ते दहा दिवस पावसाने उघडीप देऊन लख्ख सूर्यप्रकाशाची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. (Jalgaon News Rain Update)

जुलै महिन्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. अनेक शेतातील पाण्याचा निचरा झालेला नाही. अनेक ठिकाणी पिके (Jalgaon News) पाण्यात उभी असून, ती पिवळी पडत आहेत. सूर्यप्रकाशाअभावी शेतातील वाफ होत नाही. शेतात तण वाढले आहे. तणनाशक मारल्यानंतर त्यावर सूर्यप्रकाश पडला तर तण जळून जाते. मात्र सूर्यप्रकाशच पडत नाही. यामुळे पिकांना खतांचा पहिला डोस देता येत नाही.

पेरण्या उशिराने त्‍यात पावसाची संततधार

जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने पेरण्या उशिरा झाल्या. काही ठिकाणी दुबार पेरण्यांची स्थिती होती. मात्र जुलै महिन्यातील दमदार पावसाने सर्वच चित्र पालटले. पेरण्यांना जीवदान मिळाले. सिंचन प्रकल्पात साठा झाला. अनेक ठिकाणी मुसळधारेने लहान सिंचन प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. आता पावसाच्या पूर्णतः उघडिपीची गरज असल्याचे शेतकरी किशोर चौधरी यांनी सांगितले. जुलैतील चांगल्या पावसाने कोरडवाहू शेतकऱ्यांनी रखडलेल्या पेरण्या पूर्ण केल्या आहेत. खरिपाच्या ९८ टक्के पूर्ण झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. आता गरज आहे ती पाऊस थांबून सूर्यप्रकाशाची.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT