Banana 
ऍग्रो वन

वर्षभरानंतर केळीचे दर वाढले; दोन महिन्‍यांपासून दरात सुधारणा

वर्षभरानंतर केळीचे दर वाढले; दोन महिन्‍यांपासून दरात सुधारणा

संजय महाजन

जळगाव : खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीचे उत्‍पादन होते. परंतु गेल्या वर्षापासून कोरोनामुळे चांगला भाव केळीला मिळत नव्हता. मात्र दोन महिन्यापासून केळीला चांगला भाव मिळून साधारण १३०० रूपयांपर्यंत भाव मिळत असल्याने केळी उत्‍पादकांमध्‍ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (jalgaon-news-Banana-prices-rose-last-one-year-Rate-improvement-from-two-months)

केळीची निर्यात परदेशात होते. यामुळे मार्चमध्येच केळी दरात चांगली सुधारणा झाली. मार्चअखेरीस दर १५०० रुपये प्रतिक्विंटल, असे झाले होते. जळगाव जिल्‍ह्यातील रावेर तालुक्‍यातून केळीची आखातातील इराण, इराक, बहरीन, सौदी अरेबिया आदी भागांत निर्यात होते. यामुळे केळीला चांगले भाव मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर व नंदुरबारमधील अक्कलकुवा, तळोदा व शहादा तालुक्यांत केळीची काढणी सुरू आहे. रावेर, मुक्ताईनगर, शहादा, यावल भागांत निर्यातक्षम केळीचे उत्पादन अधिक होत आहे. २२ ते २५ च्या रासची केळी या भागात उपलब्ध आहे. या केळीला अधिकचे दर मिळत आहेत.

गतवर्षी होता ३५० रूपयांचा भाव

गेल्या वर्षांमध्ये कोरोनामुळे केळीला ३५० रुपयांचा भाव मिळत होता. त्यामुळे उत्पादन खर्चही शेतकऱ्यांचा निघत नव्हता. कोरोनामुळे लागलेल्‍या लॉकडाउनमुळे बाहेरची निर्यात थांबलेली होती. यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नव्‍हता.

दोन महिन्‍यांपासून दर हजाराच्‍यावर

गेल्या दोन महिन्यापासून केळीला बाराशे ते तेराशे रुपयाचा दर मिळू लागले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील काही शेतकऱ्यांची केळी अकराशे रुपये दराप्रमाणे विकली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील केळी दिल्लीला विक्रीसाठी नेली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Maharashtra Live News Update: भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य बहरलं

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

Ladki Bahin Yojana: लाडकींना सरकारकडून दणका, २६.३४ लाख महिला अपात्र; नेमकं कारण काय?

Nandurbar Accident : धुळे- सुरत महामार्गावर दोन भीषण अपघात; कोंडाईबारी घाटात वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT