जळगावातील खड्ड्यांबाबत होणार जनहित याचिका; तत्‍पुर्वी वकिलाकडून नोटीस

जळगावातील खड्ड्यांबाबत जनहित याचिका; तत्‍पुर्वी वकिलाकडून नोटीस
Jalgaon city
Jalgaon city
Published On

जळगाव : जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था ग्रामीण भागातील रस्त्यांपेक्षाही बिकट झाली आहे. अमृत योजनेमुळे शहरातील प्रत्येक रस्ता खोदून ठेवला आहे, तर योजनेचे काम पूर्णत्वाकडे येऊनही रस्त्यांची डागडुजी झालेली नाही. रस्त्यांमधील खड्ड्यांमधून वाहन चालवणे, चालणेही कठीण झाले असून हे खड्डे नागरिकांच्या जिवावर उठले आहेत. या स्थितीमुळे नागरिकांचा उद्रेक होऊ पाहत असून त्याचा प्रत्यय सुरू झाला आहे. यावर शहरातील वकील ॲड. प्रदीप कुळकर्णी यांनी या प्रश्‍नाची जबाबदारी स्वीकारत याप्रश्‍नी जनहित याचिका दाखल करण्याचे ठरवले आहे. (jalgaon-news-damage-road-Public-interest-litigation-regarding-pits-in-Jalgaon-Prior-notice-from-the-lawyer)

अगोदर बजाविली नोटीस

जळगावातील नामांकित वकिलाने याप्रश्‍नी महापौरांसह आयुक्त, जिल्हाधिकारी व नगरविकास विभागाच्या सचिवांना नोटीस पाठवली आहे. नोटीस बजावून महिनाभरात रस्त्यांची कामे सुरू करून ती पूर्ण करण्यासंबंधी मुद्याचा उल्लेख या नोटिशीत केला आहे.

महिनाभरानंतर याचिका

महिनाभरात अपेक्षेप्रमाणे रस्त्यांचे काम सुरू होणे अशक्यच आहे. त्यामुळे महिनाभरानंतर ॲड. कुळकर्णी याप्रश्‍नावरुन सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून, तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसह जनहित याचिका दाखल करणार आहेत.

Jalgaon city
शाळेतील डिजीटल साहित्‍याची चोरी

असे आहेतनोटिशीतील मुद्दे

- महापौर, आयुक्त, जिल्हाधिकारी व नगरविकास विभागाच्या सचिवांना याद्वारे त्यांचे पद व त्यासंबंधी कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.

- शहरातील सर्व रस्ते सर्वसामान्य नागरिकांना पायी चालणे, वाहन चालविण्यासाठी गैरसोयीचे झाले आहेत. एकही रस्ता विनाखड्ड्याचा नसून दुचाकीस्वारांना त्यामुळे कंबरेचे व पाठीचे आजार जडले आहेत

- रस्त्यातील खड्डे चुकविताना अपघात होऊन नागरिक जायबंदी होत आहेत, काहींचा तर त्यात बळी गेला आहे.

- या स्थितीवर कोणत्याही प्रकारे उपाययोजना न झाल्याने गेल्या दोन-तीन वर्षांत भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

- या सर्व स्थितीत जबाबदार अधिकारी व पदाधिकारी म्हणून संबंधित प्रतिवादींनी कर्तव्यात कसूर केला असून पदाला योग्य न्याय दिलेला नाही

- अशा स्थितीत प्राप्त माहितीनुसार केवळ रस्त्यांसाठी शासनाने मनपास १०० कोटींचा निधी दिला असून आणखी १०० कोटी प्रस्तावित आहे. त्याचा विनियोग योग्यरितीने केलेला नाही

- या पार्श्वभूमीवर प्रतिवादींनी महिनाभरात रस्ते बांधकामाचे काम सुरू करून पूर्ण करावे

- रस्तेकामासाठी प्राप्त १०० कोटी व भविष्यात प्राप्त होणारा १०० कोटी अशा २०० कोटींच्या निधीसाठी स्वतंत्र खाते निर्माण करून हा निधी केवळ रस्त्यांच्या निर्मितीसाठीच वापरावा

जळगावातील रस्त्यांच्या अवस्थेने सामान्य नागरिक त्रस्त व जीव धोक्यात घालून वावरत आहेत. या भयावह स्थितीवर आवाज उठविण्यासाठी कायदेशीर बाबीने लढा देण्याचे ठरवले आहे.

- ॲड. प्रदीप कुळकर्णी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com