जळगाव : भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा सबस्टेशनवर शेतकऱ्यांना झिरो लोडशेडिंग नावाखाली दिवसभरातून एक तास वीज दिली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पीक संपण्याच्या मार्गावर असल्याने आजरोजी शेतकऱ्यांनी सब स्टेशनावावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चा काढला असतांना त्या मोर्चातील शेतकऱ्याने (Farmer) अधिकारी व कर्मचाऱ्यांना कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (jalgaon news Attempts of farmers to commit suicide at the substation itself)
वीज वितरण कंपनीचा (MSEDCL) गलथान कारभारामुळे आज वेल्हाळा गावातील शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीमुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. वेल्हाळा सब स्टेशनच्या माध्यमातून गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांना झीरो लोडशेडिंगच्या नावाखाली एक तास वीज दिली जात आहे. यामुळे शेतातील (Onion) कांदा, केळी, मका, गहू यासारखे पिके संपण्याच्या मार्गावर आहे. विजेच्या त्रासाला कंटाळून पिकाचे होणारे नुकसान समोर दिसत असल्याने शेतकऱ्यांनी थेट सबस्टेशनवर मोर्चा काढला.
आत्महत्येचा प्रयत्न
वेल्हाळा सब स्टेशनवर शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला असतांना त्या मोर्चातील शेतकऱ्याने वीज कर्मचाऱ्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोर्चात आलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करणारा शेतकऱ्यास रोखले व त्वरित वेल्हाळा गावातील सर्व वीज बंद करण्यात सांगितले. ज्या अधिकाऱ्यांनी वेल्हाळा गावाला झिरो लोड शेडिंगचे आदेश दिले. ते आल्याशिवाय एकही शेतकरी सब स्टेशनमधून उठणार नाही असा इशारा देण्यात आला.
आमदारांची भेट
भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा सब स्टेशनच्या झिरो लोड शेडींग शेतकऱ्यांना मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढून अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क केला. मात्र एकही अधिकारी घटनास्थळी न आल्याने संतप्त शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन तासानंतर भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे यांनी वेल्हाळा सबस्टेशनला सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला भेट दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.