कृषिपंप 
ऍग्रो वन

२४ लाखांचे वीजबिल भरून १३ शेतकरी कृषिपंप थकबाकीमुक्त

२४ लाखांचे वीजबिल भरून १३ शेतकरी कृषिपंप थकबाकीमुक्त

Rajesh Sonwane

जळगाव : महावितरणच्या महा कृषी ऊर्जा अभियानात जवळपास ६६ टक्के सूट मिळविण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घेत सावदा येथे १३ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी २४ लाखांचे वीजबिल भरत कृषिपंप थकबाकीतून मुक्त होण्याचा मान मिळविला. महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक (प्र.) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (jalgaon-news-13-farmers-free-from-arrears-by-paying-agreeculture-pump-electricity-bill-of-24-lakhs)

जळगाव, नशिराबाद, भुसावळ, मुक्ताईनगर, सावदा येथे भेट देऊन वीजबिल थकबाकी वसुलीसह महावितरणच्या कामकाजाचा आढावा प्रसाद रेशमे यांनी घेतला. कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी महा कृषी ऊर्जा योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावे; तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा असे आवाहन त्यांनी केले. या आवाहनास प्रतिसाद देत रावेर व यावल तालुक्यातील १३ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी तब्बल २४ लाख रुपयांचे वीजबिल भरले आणि थकबाकीमुक्त होण्याचा मान मिळवला.

यांनी भरले बिल

बिल भरण्यामध्‍ये अनिता चौधरी, विलास चौधरी, यादवराव पाटील, लक्ष्मण चौधरी, बाबुलाल गुप्ता, हिरामण बोंडे, गोविंदा इंगळे, गुणवंत नेमाडे, संजय पाटील, कविता राणे, भगवान पाटील, पंडितराव चौधरी व डिगंबर पाटील या कृषिपंप ग्राहकांचा समावेश आहे. या सर्व ग्राहकांचा सहव्यवस्थापकीय संचालक (प्र.) रेशमे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधीक्षक अभियंता फारूक शेख, कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे, उपविभागीय व कक्ष अभियंत्यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT