Erandol News Saam tv
ऍग्रो वन

Erandol News : कर्जफेडीच्या विवंचनेतून शेतकऱ्याने संपविले जीवन

Jalgaon News : शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. परंतु उत्पन्न चांगले न आल्याने त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले. यामुळे भगवान महाजन हे सतत विचारात राहत होते.

साम टिव्ही ब्युरो

एरंडोल (जळगाव) : शेतीसाठी कर्ज घेतले परंतु पावसाचा लहरीपणामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. यामुळे (Jalgaon) आता कर्जफेड कशी करायची याची विवंचना होती. यातूनच (Farmer) शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविल्याची घटना नागदुली (ता. एरंडोल) येथे घडली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

एरंडोल (erandol) तालुक्यातील नागदूली येथील भगवान गंभीर महाजन (वय ४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पत्नी, दोन मुले, आई, भाऊ यांच्यासह गावात वास्तव्यास होते. शेती काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. परंतु उत्पन्न चांगले न आल्याने त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले. यामुळे भगवान महाजन हे सतत विचारात राहत होते. यातूनच त्यांनी २७ मार्चला शेतामध्ये कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उपचारादरम्यान मृत्यू 
विषारी द्रव्य घेतल्याचे कुटुंबियांना समजताच त्यांनी भगवान महाजन यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र ३१ मार्चला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates : आजपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! वाहतूक कोंडीची कटकट संपणार, सर्वात मोठा उड्डाणपूल आज खुला होणार

EPFO Update : ...तर या ईपीएफओ कर्मचाऱ्यांचे खाते होणार बंद; मिळणार नाहीत पैसे

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना आर्थिक स्थैर्य लाभेल; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

LPG Price Cut : एलपीजी सिलिंडर ५१ रूपयांनी झाला स्वस्त, मुंबई-दिल्लीत किती किंमत?

SCROLL FOR NEXT