Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Farmer: केळीच्‍या उत्‍पादनातून एक कोटींचे उत्‍पन्‍न; मजूर, सालदारांना दिले कपडे

केळीच्‍या उत्‍पादनातून एक कोटींचे उत्‍पन्‍न; मजूर, सालदारांना दिले कपडे

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाढे गावच्या राजेंद्र हरी पाटील या शेतकऱ्याने केळीच्या उत्पादनाच्या (Banana Crop) माध्यमातून एक कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली. चांगले उत्पन्न मिळाल्याने राजेंद्र पाटील यांनी आपल्या शेतात (Jalgaon) राबणाऱ्या सालदार, मजूर यांना कपडे, अन्न धान्य, मिठाई वाटप करून एक अनोख्या पद्धतीने ऋण व्यक्त करत दिवाळी साजरी केली. (Live Marathi News)

नोकरी सोडून शेती

राजेंद्र पाटील यांच्याकडे स्वतःची दीड एकर शेती आहे. एकेकाळी (Farmer) शेतात मजुरी करत असल्याने राजेंद्र पाटील यांना (Banana) शेतीचे चांगले ज्ञान अवगत झाले. मजुरी करीत असतानाच कृषी पदवी मिळवली. राजेंद्र पाटील हे नोकरीलाही लागले होते. मात्र त्याठिकाणी त्यांचे वाद निर्माण झाल्याने त्यांनी नोकरी सोडली आणि पुन्हा शेतीकडे वळले. जमीन कमी असल्याने पुरेसे उत्पन्न घेता येत नाही. यामुळे पाटील यांनी सुरुवातीला काही जमीन भाडे तत्वावर घेत शेती करण्यात सुरुवात केली. त्यात त्यांना चांगले यश मिळत गेले.

निर्यातक्षम केळी निर्माणचे तंत्र अवगत

राजेंद्र पाटील हे कृषी पदवीधर असल्याने त्यांनी नेहमीच कृषीच्या नवीन तंत्राचा वापर आपल्या शेतीसाठी केला. केळीची शेती केल्याने त्यांना उच्च दर्जाची निर्यातक्षम केळी निर्माण करण्याचे तंत्र अवगत झाले. त्यांच्या केळीला इतरांपेक्षा जास्त मागणीही असते आणि शिवाय भावही जास्त मिळत असल्याने राजेंद्र पाटील यांना चांगलाच नफा यातून मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 पैकी 63 शाळा बोगस; शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात बडा मासा लागला गळाला, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई

Medicine Price Drop: बीपी, हार्ट अटॅक आणि डायबेटिस पेशंटला दिलासा; औषधं ४० टक्के स्वस्त, ३९ औषधांच्या किंमती होणार कमी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून वाद उफाळला; एसआयटी चौकशीची मागणी

Vietnam Boat Accident: मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटना प्रकरणात मृतांचा आकडा आता पोहोचला चारवर

SCROLL FOR NEXT