Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : कापसाची अजूनही भाववाढ नाही; शेतकऱ्याला करावी लागतेय कमी दरात विक्री

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील भुसावल तालुक्यात झालेल्या बे मोसमी पावसामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. अवकाळी पावसाचा फटका कापूस, सोयाबीन, मका या पिकांना बसला आहे यामुळे उत्पादनात घट झाली

संजय महाजन

भुसावळ (जळगाव) : कापूस दरवाढीची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने कापूस घरात भरून ठेवला आहे. मात्र भाव वाढीबाबत सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसत नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून किती दिवस कापूस घरात भरून ठेवायचा या विचारातून काही शेतकरी नाईलाजाने व्यापाऱ्याला कमी दरात कापूस विक्री करत आहे.  

जळगाव जिल्ह्यातील भुसावल तालुक्यात झालेल्या बे मोसमी पावसामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. अवकाळी पावसाचा फटका कापूस, सोयाबीन, मका या पिकांना बसला आहे. यामुळे उत्पादनात घट झाली असून चांगला भाव देखील शेतकऱ्याला मिळत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. आज ना उद्या कापसाला चांगला भाव मिळेल; या अपेक्षेने शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला होता. 

साडेसहा ते सात हजार दरम्यान भाव 

कापूस दरवाढीबाबत सरकारतर्फे अजूनही निर्णय होत नसल्याने पाहिजे तसे भाव मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. बाजारपेठेतील कापसाच्या दरातील घट व भाववाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेला कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचे गणित बिघडले आहे. दिवाळीपासून शेतकऱ्याने घरात कापूस साठवून ठेवला आहे. कापसाचे दर सुरुवातीपासून ६५०० ते ७ हजार दरम्यानच राहिल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे.  

नाईलाजास्तव करावी लागतेय विक्री 

आजही शेतकऱ्यांना भाव वाढीची अपेक्षा आहे. शासनाने सीसीआय मार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू केले. पण तिथे शेतकऱ्यांना सात हजार ५०० पर्यंत भाव मिळत आहे. परंतु आठ ते दहा दिवस नंबर लागत नसल्यामुळे गाडी भाडे देणे परवडत नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. तसेच त्या ठिकाणी मोठ्या अटी व शर्ती असल्याने नाईलाजाने व्यापाऱ्यांना कमी दरात कापूस विकावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT