Harsul Police : तीन वर्षानंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल; कायद्याचा दुरुपयोग करत ज्येष्ठ नागरिकाला केली होती मारहाण

Sambhajinagar News : मारहाणीनंतर फॅमिली डॉक्टरकडे उपचार घेतल्यानंतर २५ मार्चला घाटीत जाण्यासाठी पोलीस ठाण्यात मेडिकल मेमो घेण्यासाठी गेले. यावेळी मेमो देण्यासाठी अडथळा निर्माण केला.
Harsul Police
Harsul PoliceSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये पद आणि कायद्याचा गैरवापर करून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अंकुश दौड यांनी एका ज्येष्ठ नागरिकास मारहाण केली होती. हा प्रकार २०२१ मध्ये घडला होता. पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकाने आत्मदहनाचा इशारा देताच हर्सूल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल येथील एका सोसायटीत दत्तात्रय पांडुरंग ठोंबरे हे ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास होते. त्याच ठिकाणी ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अंकुश दौड राहत होता. त्यांनी ठोंबरे यांच्याविरुद्ध सोसायटीतील लोकांकडून खोटे गुन्हे दाखल करून घेतले. शिवाय एका महिलेस विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यास सांगितला. त्यानंतर १४ मार्च २०२१ रोजी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नितीन कामे हा घरी आला. त्यांनी अंकुश दौंड यांच्या सांगण्यावरून कुटुंबातील सदस्यांसमोर ठोंबरे यांना शिवीगाळ करून धमकाविले. तसेच पोलीस व्हॅनमधून नेत अमानुषपणे मारहाण केली. 

Harsul Police
Jyotiba Temple : खव्याच्या प्रसादात ब्लेडचा तुकडा; ज्योतिबा मंदिर परिसरातील प्रसाद विक्रीच्या दुकानातील प्रकार 

ठोंबरे यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार 

मारहाणीनंतर फॅमिली डॉक्टरकडे उपचार घेतल्यानंतर २५ मार्चला घाटीत जाण्यासाठी पोलीस ठाण्यात मेडिकल मेमो घेण्यासाठी गेले होते. यावेळी मेमो देण्यासाठी अडथळा निर्माण केला. मात्र, त्यानंतर तासाभराने मेडिकल मेमो मिळाला होता. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नितीन कामे आणि अंमलदार अंकुश दौड यांची तक्रार तत्कालीन पोलीस आयुक्तांकडे केली होती. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी अंबादास सोन्ने यांची नियुक्ती केली होती. 

Harsul Police
Buldhana Crime : महावितरणच्या विद्युत पोल वरील तारा पुन्हा चोरीला; आसलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

तीन वर्षानंतर गुन्हा दाखल 

मात्र, त्यांनी देखील पदाचा वापर करून मारहाण झाली नाही; असे खोटे जबाब लिहून घेतले होते. याप्रकरणी दोषींवर कारवाई करा, अशी मागणी ठोंबरे यांनी लावून धरली होती. त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा दिला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे ठोंबरे यांना तब्बल तीन वर्षानंतर न्याय मिळाला असेच म्हणावे लागेल. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com