Increase in the price of vegetables: भाज्यांचे दर कडाडले, सर्वसामान्यांच्या बजेटला कात्री
Increase in the price of vegetables: भाज्यांचे दर कडाडले, सर्वसामान्यांच्या बजेटला कात्री Saam Tv
ऍग्रो वन

Increase in the price of vegetables: भाज्यांचे दर कडाडले, सर्वसामान्यांच्या बजेटला कात्री

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदनगर: राज्यामध्ये गेल्या काही दिवस अनेक भागामध्ये ढगाळ वातावरणाने पालेभाज्या (vegetables) आणि फळभाज्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अशीच काहीशी परिस्थिती अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यामध्ये देखील आहे. बदलत्या हवामानाने (Weather) फळभाज्यांच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. याचा परिणाम भाजीपाल्याच्या किंमतीवर झाला आहे. मंडईमध्ये भाजीपाल्यांचे भाव चांगलेच कडाडले आहेत.

अहमदनगरमध्ये गवारीने १५० रुपये प्रति किलोचा भाव घेतला आहे. तर इतर भाज्यांचे भाव (vegetables Prices) देखील गगनालाच भिडले आहेत. जिल्ह्यामध्ये (district) कमी अधिक फरकाने सर्वत्र भाजीपाल्यांचे भाव वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे. भाजीपाल्यांचे भाव सरासरी ३० ते ५० रुपये किलो असतात. हवामानामधील बदलाने सर्व पिकांच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला आहे. (increase in the price of vegetables in maharashtra)

हे देखील पहा-

मात्र, तळहाताच्या फोडाप्रमाणे पिके वाढवणाऱ्या शेतकऱ्यांच्या (farmers) पदरामध्ये या भाववाढीमुळे काही पडत नसून व्यापारी (Merchant) एका दिवसात २० ते ४० टक्के नफा कमवत असल्याचे शेतकऱ्यांचे सांगणे आहे. नैसर्गिक संकटामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आवक घटल्याने भाज्यांचे भाव वाढले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून गवार, शेवगा यांची आवक फारच कमी होत आहे. यामुळे ठोक बाजारात गवारीला ११० ते १२० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे तर शेवग्याला ८० ते १०० रुपये किलो प्रमाणे भाव मिळत आहेत, असे व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे. आवक आणि मागणीचा समतोल राखण काहीसे कठीण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

भाज्यांचे होलसेल आणि किरकोळ भाव खालीलप्रमाणे

गवार - ११० रुपये (होलसेल) - १५० रुपये (किरकोळ)

शेवगा- ८० रुपये (होलसेल) - १२० (किरकोळ)

कारले- ५० (होलसेल)- ८० (किरकोळ)

बटाटा- २५ (होलसेल)- ३० (किरकोळ)

टोमॅटो- २२ (होलसेल)- ४० (किरकोळ)

वाटाणा- २० (होलसेल)- ३० (किरकोळ)

मिरची - ६० (होलसेल)- ८० (किरकोळ)

सिमला मिरची- ५० (होलसेल)- ८० (किरकोळ)

३ ते ४ महिने पीक सांभाळून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळवणे खूपच अवघड झाले आहे. शेतमजुरांना ३०० रुपये मंजुरी मिळते. मात्र, किरकोळ बाजारामध्ये भाजीला १०० रुपये किलोचा भाव आहे. यामुळे ग्राहकांच्या खिसालाही हे भाव परवडणारे नाही. मात्र, व्यापारी मोठा नफा कमवून मोकळे होत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT