Marigold Saam tv
ऍग्रो वन

Water Shortage : पाणी पातळी घटली; पाण्याअभावी शेतकऱ्याची झेंडू बाग सुकली

Hingoli News : झेंडू शेतीवर पाणी अभावी मोठे संकट कोसळले आहे. ही शेती आता नष्ट व्हायला सुरुवात झाली आहे. लागवड करताना हजार रुपयांचा खर्च, महागड्या औषध फवारणी केली. मात्र उत्पादन शून्य असं गणित शेतकऱ्यांचं बिघडला

Rajesh Sonwane

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या वर्षी जमिनीतील पाणी पातळी अचानक घटल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी जमिनीत साठवणूक असलेल्या पाण्याच्या भरोशावर झेंडूच्या बागा फुलवल्या होत्या. त्या आता पाण्याअभावी नष्ट होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. झेंडूची फुले विक्री करण्याऐवजी शेतकरी या संकटामुळे शेतातच तोडणी करून फेकून देत आहेत. 

हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून बागायतदार शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांना बगल देत झेंडू फुलांची शेती फुलवायला सुरुवात केली होती. हिंगोली जिल्ह्यात उत्पादन होत असलेल्या या झेंडू शेतीमधून शेतकऱ्यांना चांगला फायदा देखील होत होता. दिवाळी, दसरा यासह विविध सणांना झेंडूच्या फुलाची प्रचंड मागणी होत असल्याने शेतकरी अधिकच या झेंडू शेती लागवडीकडे वळला होता.  

पाण्याच्या पातळीने शेतकऱ्यांवर संकट 

मात्र २०२५ हे वर्ष शेतकऱ्यांना मात्र आर्थिकदृष्ट्या नुकसानीचे ठरले आहे. त्याला कारण म्हणजे हिंगोली जिल्ह्यात अचानक जमिनीतील कमी झालेली पाणी पातळी. मागील पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये शेवटच्या महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त झालं. मात्र अचानक पाऊस पडून पूर परिस्थिती निर्माण झाली आणि आकाशातून बरसलेला पाणी पुराच्या माध्यमातून वाहून गेले. त्यामुळे यंदा फेब्रुवारी महिन्यातच जमिनीच्या पोटातील पाणी संपले आहे. 

उत्पादन होणार शून्य 

शासकीय तलाव देखील कोरडे पडत असल्याने आता पाणी उपलब्ध कुठून करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे. जिथे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. तिथे झेंडू शेतीला पाणी कसे द्यायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. हिंगोलीत शेकडो हेक्टरवर लागवड झालेल्या या झेंडू शेतीवर पाणी अभावी मोठे संकट कोसळले आहे. ही शेती आता नष्ट व्हायला सुरुवात झाली आहे. लागवड करताना हजार रुपयांचा खर्च, महागड्या औषध फवारणी केली. मात्र उत्पादन शून्य असं गणित शेतकऱ्यांचं बिघडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

अंगणाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट! दिवाळीचा बोनस कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT