Hingoli News Saam tv
ऍग्रो वन

Hingoli News : तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी उधळले एक रुपयांचे नाणे; विमा मिळाला नसल्याने अनोखे आंदोलन

Hingoli News : केंद्र व राज्य शासनाने एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा काढण्याची योजना सुरू केली. या योजनेत सहभागी होऊन शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता

संदीप नागरे

हिंगोली : शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामात शेतात लागवड केलेल्या पिकांना सुरक्षा कवच हवे व पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाईसाठी पीक विमा काढण्यात आलेला असतो. मात्र पिकांचे नुकसान झाल्यानंतर देखील पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन करत तहसील कार्यालयात १ रुपयांचे नाणे उधळले. 

केंद्र व राज्य शासनाने एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा (Crop Insurance) काढण्याची योजना सुरू केली. या योजनेत सहभागी होऊन शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात गेल्यावर्षी हजारोंच्या संख्येने एक रुपयात पीकविमा उतरून देखील शेकडो शेतकऱ्यांना अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नाही. आता नवीन खरीप हंगाम सुरु होणार असून त्यात नव्याने पीक विमा उतरविण्याची वेळ आली आहे. तरीदेखील रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. 

मागील वर्षी काढलेल्या पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याने आज सेनगाव शहरात (Farmer) शेतकरी संघटनेने एक रुपयांचे नाणे महसूल प्रशासनाच्या दारात उधळून आंदोलन केले आहे. शेतकरी नेते मारुती गीते यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात अनेकांनी सहभाग घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 10 सेकंदात धावत्या बसला आग; जीवाची बाजी लावत डिलीव्हरी बॉयने वाचवले प्रवाशांचे प्राण, थरारक व्हिडीओ व्हायरल

Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

IIM Mumbai Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IIM मुंबईत नोकरी; विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai : मंत्रालयातील त्या लिपिकावर कारवाई; तोपर्यंत काम थांबवलं, नरहरी झिरवळ यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT