Hingoli News Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : गतवर्षीच्या पीक विम्याची रक्कम अजूनही मिळेना; शेतकऱ्यांचा कृषी कार्यालयात ठिय्या

Hingoli News : निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान होत असते. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरु केली आहे. एक रुपयात विमा काढून पिकांना संरक्षण दिले जात असते

संदीप नागरे

हिंगोली : खरीप आणि रब्बी हंगामाचा पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. विमा कंपनीकडून अजूनही नुकसान भरपाईची रक्कम मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज हिंगोली कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी कार्यालयाचा ताबा घेत ठीय्या आंदोलन सुरू केले आहे. 

निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान होत असते. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारने (Crop Insurance) पीक विमा योजना सुरु केली आहे. एक रुपयात विमा काढून पिकांना संरक्षण दिले जात असते. त्यानुसार शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढत असतो. मात्र पिकांचे नुकसान झाल्यानंतर देखील भरपाई लवकर मिळत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळते. आता हिंगोली (hingoli) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीचा खरीप हंगामाचा व रब्बी हंगामाच्या विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. 

केंद्र सरकारच्या पिक विमा योजनेत पात्र असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना मागील वर्षाचा खरीप पिकासह रब्बी हंगामातील पिकांचा पिक विमा मिळाला नाही. यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना सोबत घेत हिंगोलीच्या कृषी अधीक्षक कार्यालयाचा ताबा घेतला आहे. कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांच्या कक्षात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केला असून पिक विमा वेळेपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. अखेर ठोस आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT