Nashik Krushi Utpanna Bazar Samiti , Nashik APMC Election News
Nashik Krushi Utpanna Bazar Samiti , Nashik APMC Election News saam tv
ऍग्रो वन

Nashik Krushi Utpanna Bazar Samiti सभापती, उपसभापती निवडी हाेणार; जाणून घ्या काय घडलं २४ तासांत

अभिजीत सोनावणे

Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik Krushi Utpanna Bazar Samiti) सभापती, उप सभापती पदाच्या निवडीच्या प्रक्रियेची स्थगिती उच्च न्यायालयाने (high court) उठवली आहे. तसेच तत्काळ निवड प्रक्रिया राबववी असे आदेश केल्याची माहिती उच्च न्यायालयात गेलेल्या संचालकांनी साम टीव्हीशी (saam tv) बाेलताना सांगितले. (Maharashtra News)

नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीत देवीदास पिंगळे (devidas pingle) गटाला बारा तर शिवाजी चुंभळे (shivaji chumbhale) गटाला सहा जागा मिळाल्या आहेत. कोरोना काळात बाजार समितीने अन्नधान्य वाटपात गैरव्यवहार करून आर्थिक नुकसान केल्याच्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीपदाची निवड प्रक्रिया स्थगित करावी असा आदेश सहकार व पणन सह सचिवांनी नुकताच दिला हाेता.

त्यामुळे पिंगळे गटाला मोठा धक्का बसला होता. या विरोधात संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं सह सचिवांचे आदेश बेकायदेशीर ठरवत तत्काळ निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत असे संचालकांनी सांगितलं. दरम्यान २४ तासातच निर्णय बदलल्याने नाशिक बाजार समितीची सभापती पदाची निवड प्रक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

SCROLL FOR NEXT