राज्यातील मोठी धरणं 'ओव्हर फ्लो'; नजीकच्या गावांना सर्तकतेचा इशारा
राज्यातील मोठी धरणं 'ओव्हर फ्लो'; नजीकच्या गावांना सर्तकतेचा इशारा Saam TV
ऍग्रो वन

राज्यातील मोठी धरणं 'ओव्हर फ्लो'; नजीकच्या गावांना सर्तकतेचा इशारा

अभिजीत सोनावणे, विनोद जिरे, अभिजीत घोरमारे, संजय जाधव

बीड: बीडसह उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा मांजरा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने काल दुपारी कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र रात्री झालेल्या जोरदार पावसाने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. त्यामुळे आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून धरणाचे सहा दरवाजे 25 इंच ने उघडण्यात आले असून 149.80 क्यूसेस वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान मांजरा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूर येण्याची शक्यचा निर्माण झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तर मांजरा धरण 100 टक्के भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

तिकडे भंडारा जिल्ह्याच्या मोहाड़ी तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक तलाव ओवर फ्लो होवून वाहत असल्याने अनेक मासे वाहून गेले असून मस्त्य व्यावसायिकांचे करोड़ो रूपयांचे नुकसान झाले आहे. तर विशेष म्हणजे सालेबर्डी येथील तलाव ओवर फ्लो झाल्याने मासे रस्त्यावर आले असून रस्त्यावर हजारों मास्यांचा सडा पडला आहे. मास्याचा खच बघता रस्त्यावर वर काटा करत विक्री करण्याची मासेमारांना वेळ आली आहे. सालेबर्डी तलावापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर रस्त्यावर एक प्रकारे दुकान टाकून मासे विकण्याची वेळ मस्त्य व्यावसायिकांवर आली आहे. शिवाय सालेबर्डी तलाव ओवर फ्लो झाल्याने या तलावातील करोडों बीज व लाखो मासे वाहून गेले असून बहुउद्देश्यीय मासेमार सहकारी संघटना आंधळगाव लाखो रूपयांचे नुकसान आहे.

नाशिकमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 1 हजार क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग होतं आहे. सकाळी 8.30 वाजल्यापासून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गोदावरीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होणार आहे. तर नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे खडकपूर्णा असून यावर्षी तो व ओहरफ्लो झाला आहे, मागील महिन्यापासून धरणाचे दरवाजे कमीजास्त प्रमाणात उघडले जात आहेत. राज्यातील हवामान अंदाजानुसार मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली गेली होती, त्यानुसार भरपूर पाऊस झाला. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पातील पाण्याच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने रात्रीपासून धरणाचे 17 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून 18 हजार 564 क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SCROLL FOR NEXT