Guava Farm From Pandharpur saam tv
ऍग्रो वन

Pandharpur News : पेरुला निम्म्यानेच मिळू लागला दर, भाव गडगडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

पेरूची शेती सध्या तोट्यात चालल्याचे शेतकरी सांगू लागले आहेत.

भारत नागणे

Pandharpur News :

डाळिंबाला पर्यायी पिक म्हणून सोलापूर जिल्ह्यात पेरूची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे बाजारात पेरुची आवक वाढली आहे. त्यामुळे किलोमागे 30 रुपयांनी पेरुचे भाव गडगडले (Guava Price Drop) आहेत. पेरुचे भाव पडल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. (Maharashtra News)

शकील काझी यांच्याकडे 18 एकर क्षेत्रावर तैवान जातीच्या पेरूची लागवड केली आहे. यापूर्वी ते डाळिंबाचे उत्पादन घेत होते. बदलत्या हवामान आणि वाढत्या कीड रोगामुळे डाळिंबाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांनी पर्यायी पीक म्हणून पेरूची लागवड केली आहे.

सध्या त्यांच्या पाच एकरावरील पेरूची तोडणी सुरू आहे. एकरी 30 टन इतका त्यांना उत्पादन मिळाले आहे परंतु अपेक्षित दर बाजारात मिळत नसल्याने त्यांची पेरूची शेती सध्या तोट्यात गेली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरासरी 60 ते 70 रुपये प्रति किलो दर मिळाला तर एकरी पाच ते सहा लाख रुपयांचे नफा मिळू शकतो असे सांगितले जात आहे. सध्या निम्म्यानेच बाजारात दर मिळत असल्याने पेरूची शेती सध्या तोट्यात आल्याने पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT