(कल्याण पाचांगणे)
शेतकऱ्यांना अर्थिक दृष्ट्या संकटातून बाहेर काढणे हे सरकारचे कर्तव्य आहे. वाइन ही दारू नाही, असे म्हणत आघाडी सरकारने वाईन ही किराणा दुकानात विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, विरोधी भाजपचे नेतेमंडळींनी हा धोरणात्मक निर्णय लोकहिताचा नसल्याचे सांगितले आहे. या निर्णयाचा दूरगामी समाजावर परिणाम होईल, असाही संभाव्य धोका देवेंद्र फडणविस यांनी बोलून दाखविला आहे. (Grape Producers welcome decision to allow wine in super markets)
या घोळात मात्र महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने महाविकास आघाडीच्या निर्णयाचे जोरदार स्वागत तर केलेच, शिवाय हा निर्णय कसा फायाद्याचा आहे, हेही पटवून देण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, खजिनदार सुनिल पवार, चंद्रकांत लांडगे या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्रच्या आघाडी सरकारने वाईन (Wine) ही किराणा दुकाने, सुपर मार्केट या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्याचा नुकताच निर्णय घेतला. हा निर्णय राज्यातील (Maharasthtra) द्राक्ष उत्पादक शेतक-यांच्या फायदाचा ठरणार असुन वाईन उद्योगाला चालना देणारा ठरणार आहे. त्यामुळे वरील सरकारी निर्णयामुळे वाईनला मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊन वाईनचा खप वाढणार आहे. तसेच अडचणीत आलेल्या वाईनरी उद्योगाला संजिवनी मिळणार आहे, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने मांडली आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी ३६ कोटी लिटर देशी दारुची (Liquor) विक्री होते. भारतीय बनावटीचे विदेशी मद्य विस्की, रम, वोडका अशा स्वरुपात २२ कोटी लिटरची विक्री होते. बिअरची ३० कोटी लिटर इतकी विक्री होते. एकुण सुमारे ८८ कोटी लिटर पेक्षा जास्त मद्य विक्री दरवर्षी केली जाते. वाईन केवळ ७५ लाख लिटर इतकीच विकली जाते. १ टक्यापेक्षा कमी वाईन विक्री होत असताना वाईन उद्योगास चालना मिळण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने घेतलेला निर्णय द्राक्ष उत्पादक शेतक-यांच्या हिताचा आहे.
अनेक दिवसांच्या प्रलंबित मागणी शेतकऱ्यांची मान्य झाली आहे. जगामध्ये इटली, फ्रान्स, स्पेन, अमेरिका, अर्जेंटिना हे देश वाईन उत्पादना मध्ये आग्रेसर आहेत. मर्यादित व नियमित सेवन केल्यास वाईन आरोग्यदायी आहे, असा सल्ला दिला जातो. वाईनला हेल्थ फुड समजले जाते. तसेच त्यास मेडीशनल व्हॅल्यु आहे. लाल, श्वेत, गुलाबी, जांभळा, हिरवा अशा अनेक प्रकारच्या द्राक्षाच्या जातीनुसार विविध रंगामध्ये वाईन उपलब्ध होते. मात्र आजही ग्राहकांमध्ये पांढरी व तांबडी अशा दोन प्रकारच्या वाईनची चर्चा होते.
वेगवेगळा स्वाद, रंग व गंधामुळे वाईनचे विविध ब्रॅन्ड जगभर प्रसिद्ध आहे. द्राक्षापासून निर्मीत द्राक्षासव, या उपपदार्थाला आरोग्यदायी समजण्यात येत असल्याने ते विनासायास मेडिकल दुकानांमध्ये सर्वत्र उपलब्ध आहे. वाईन हे आरोग्यदायी असुन त्यामध्ये मद्य प्रमाण अल्प आहे. तरुण, पुरुष, महिला यांच्यासाठी स्वतंत्र लोकप्रिय ब्रॅंड उपलब्ध असतात. जगामध्ये वाईनच्या प्रसारासाठी व प्रचारासाठी अनेक फेस्टीवल भरवले जातात व त्याद्वारे वाईनचे आरोग्यदायी महत्व ग्राहका पर्यन्त पोहचवले जाते. गुणवत्ता पुर्ण वाईनला पुरस्कार दिले जातात तसेच वाईन पार्क पर्यटन ही संकल्पना अनेक देशामध्ये लोकप्रिय आहे.
महाराष्ट्रामध्ये द्राक्षाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. राज्य शासनाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील पलुस येथे तसेच नाशिक जिल्ह्यात विंचुर येथे वाईन पार्कची उभारणी झालेली आहे. त्या वाईनरींनी उत्पादन केलेल्या वाईनला देशांतर्गतच नव्हे तर जगात मागणी आहे. देशातील वाईन उत्पादनापैकी ९० टक्के वाईन महाराष्ट्रात उत्पादीत होते. मात्र महाराष्ट्रामध्ये फक्त लिकरच्या दुकानात वाईन विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याने वाईनची तुलना मद्य अशी केली जाते. महाराष्ट्रात सुमारे ९ हजार एकरावर वाईन द्राक्ष जातींची लागवड आहे. मात्र सोयीस्कर व योग्य विक्री व्यवस्था नसल्यामुळे शेतक-यांच्या हाती मोबदला मिळत नाही.
वाईनचा खप वाढून ग्राहकांना दर्जेदार व आरोग्यदायी वाईन कमी किंमतीत व सहजपणे उपलब्ध होऊ शकेल. वाईनचा खप वाढल्याने द्राक्ष बागांची लागवड वाढण्यास चालना मिळून त्याचा फायदा शेतक-यांना मोठ्या प्रमाणात होईल. राज्यामध्ये गेल्या काही वर्षात दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस अशा प्रकारच्या अनेक समस्यांना शेतक-यांना सामोरे जावे लागत आहे. वाईनचा खप वाढल्याने द्राक्ष उत्पादकांना फायदाच होईल व वाईनच्या थेट विक्रीमुळे मध्यस्थ कमी होऊन वाईनची किंमत ग्राहकांच्या आवाक्यात येईल.
हे देखिल पहा
वाईनचे आरोग्यदायी महत्व
रेड वाईनचे सेवन केल्याने पचन शक्ती मजबुत होते, पोटातील बॅक्टेरीया नाश पावतात, पोटातील अल्सर कमी होण्यास मदत होते, रेड वाईन रक्तांच्या गुठळ्या होणाच्या समस्येवर गुणकारी आहे, वाईन पाक क्रियेत व स्वयंपाकात चवीसाठी वापरली जाते, वाईनमुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि पल्मनरी एम्बोलीजमचा धोका कमी होतो.
वाईन व कोरफड याचे मिश्रण फेस मास्क म्हणुन लावले जाते, वाईनचा वापर ब्लड शुगर लेवल कमी करण्यासाठी केला जातो, वाईन ॲन्टी ऑक्सीडंट असल्याने त्वचेमध्ये कोलेजन वाढण्यास मदत होते तसेच त्यामुळे चेह-यावर सुरकुत्या येत नाही, वाईनमध्ये ॲन्टी सेप्टीक गुणधर्म असल्याने चेह-यावरील मुरुम कमी करण्यास मदत होते, वाईन ऑर्गेनिक टोनर म्हणुन क्लिन्सर या स्वरुपात सौंदर्य उपयोगी म्हणून केला जातो.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.