Onion Wine: कांद्यालाही न्याय द्या; कांद्याचीही वाईन बनवा - शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांकडे मागणी

Onion Wine: कांद्यापासूनही वाईन तयार करा, कांदा उत्पादक शेतकऱ्याची मागणी; कार्टून आणि कवितेतून सरकारकडे शेतकऱ्याची मागणी...
Onion Wine Demand By Farmer
Onion Wine Demand By Farmerअभिजीत सोनावणे

नाशिक: द्राक्षापासून (Grapes) तयार होणारी वाईन (Wine) सुपर मार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवण्याच्या राज्यसरकारच्या निर्णयावरून आधीच गदारोळ सुरू असताना आता त्यात आणखी भर पडलीय. वाईन (Wine) हे दारु की काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत असतांना आता एक वेगळीच मागणी एका कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्याने (Farmer) कार्टून (Cartoon) आणि कवितेच्या (Poem) माध्यमातून केलीय. ज्यात त्याने कांदा हा आयुर्वेदिक असून त्याची पण वाईन करा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला सुध्दा न्याय द्या, अशी मागणी केलीय. त्यासाठी त्यांनी कार्टून आणि कवितेच्या माध्यमातून राज्याच्या कृषीमंत्र्याकडे (Minister of Agriculture) तशी मागणी केलीय. (Do justice to the onion too; Make onion wine too - Farmer demand to Agriculture Minister)

हे देखील पहा -

नाशिकच्या (Nashik) सटाण्याचे (Satana) कांदा उत्पादक शेतकरी आणि कार्टूनिस्ट संजय मोरे (Sanjay More) यांनी ही कविता केली असून ज्यात त्यांनी कांद्यापासून वाईन तयार केली तर कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल अशी मागणी केलीय. ज्या फळापासून वाईन तयार होतेय ते द्राक्ष निर्यातक्षम असतांना अनेक वेळा अडचणी निर्माण होऊन त्यांचं नुकसान होतं. तोच न्याय कांद्याला पण मिळावा आणि कांद्याची पण वाईन तयार व्हावी अशी मागणी या शेतकऱ्याने कवितेच्या माध्यमातून केल्याने सध्या हे कार्टून आणि कविता सगळीकडे व्हायरल (Viral) होतेय.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com