Surabhi Jayashree Jagdish
तुम्ही ड्रमचा पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्याचा रंग निळा असतो.
खासकरून रसायने, पाणी किंवा इतर द्रव पदार्थ साठवण्यासाठी याचा वापर होतो.
पण तुम्ही कधी विचार केलाय का की, ड्रमचा रंग निळाच का असतो? मुळात यामागे काही विशिष्ट कारणे आहेत.
काही कंपन्यांसाठी, निळा रंग हा घातक नसलेल्या किंवा कमी धोकादायक रासायनिक पदार्थांसाठी एक संकेत असतो. यामुळे कामगारांना धोकादायक आणि कमी धोकादायक पदार्थ ओळखणे सोपे होते.
निळा रंग, विशेषतः गडद निळा, अतिनील (UV) किरणांना चांगल्या प्रकारे परावर्तित करतो. यामुळे ड्रममधील द्रव पदार्थ, विशेषतः पाणी किंवा रसायने, सूर्याच्या उष्णतेने लवकर गरम होत नाहीत आणि त्यांचे गुणधर्म टिकून राहतात.
काही प्रमाणात, निळा रंग उष्णता शोषून घेतो, ज्यामुळे अतिथंड वातावरणात द्रव पदार्थ गोठण्याची शक्यता कमी होते.
ड्रम ज्या प्लास्टिकपासून बनवले जातात, ते नैसर्गिकरित्या पांढरे किंवा पारदर्शक असतात. त्यांना निळा रंग देण्यासाठी विशेष पिगमेंट वापरले जातं. पुनर्वापर प्रक्रियेत रंगांनुसार प्लास्टिक वेगळं करणं सोपं होतं.