Shruti Kadam
लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रण ओठांवर लावल्यास काळसरपणा कमी होतो आणि ओठ गुलाबी होऊ लागतात.
बीटचा रस नियमितपणे ओठांवर लावल्यास नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त होतो.
मध आणि ग्लिसरीन यांचे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास ओठ मऊ आणि गुलाबी होतात.
साखर आणि ऑलिव्ह ऑइल यांचा सौम्य स्क्रब मृत पेशी काढून टाकतो आणि ओठांचे सौंदर्य वाढवतो.
शरीरात पाणी कमी झाल्यास ओठ कोरडे व काळे पडतात. भरपूर पाणी प्यायल्यास नैसर्गिक तजेलदारपणा येतो.
सनस्क्रीनयुक्त लिप बाम वापरल्यास सूर्यप्रकाशामुळे होणारा डार्कनेस टाळता येतो.
धूम्रपान आणि हानिकारक लिपस्टिकमुळे ओठ काळे पडतात. त्यामुळे त्यापासून दूर राहणे गरजेचे आहे.