Bees Benefits To Farmers Saam Tv
ऍग्रो वन

Bees Benefits To Farmers: मधमाशांमुळे पीक उत्पादनात ५ ते ४० टक्क्के होते वाढ, काय म्हणाले तज्ज्ञ? जाणून घ्या

Bees Benefits: मधमाशांमुळे होणाऱ्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात ५ ते ४० टक्के वाढ होते. त्यामुळे मधमाशांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे, असे डॉ. सी. एस. पाटील म्हणाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Bees Benefits To Farmers:

आहारातील एक तृतीयांश भाग हा पिकांच्या परागीभवनाद्वारे मिळत असतो. मधमाशांमुळे होणाऱ्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात ५ ते ४० टक्के वाढ होते. त्यामुळे मधमाशांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे, असे राहुरी कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील म्हणाले आहेत.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित मध महोत्सवातील ‘शेती व मधमाशापालन या विषयावरील परिसंवादात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यात सातारा जिल्ह्यातील बोरगाव येथील स्वाती गुरवे ठाणे जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र कोसवाड येथील उत्तम सहाणे सहभागी झाले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डॉ.पाटील म्हणाले की, आहारातील एक तृतीयांश भाग परागीभवनाद्वारे मिळतो. परागीभवनाची प्रक्रिया होण्यासाठी राज्यात नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती पूरक आहे. मधमाशांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळे ५ ते ४० टक्क्यांपर्यंत पीक उत्पादनात वाढ झाली आहे. उत्पादनांची गुणवत्ता राखून उत्पन्न अधिक पौष्टिक होते, असेही संशोधनात पुढे आले आहे.  (Latest Marathi News)

कीडनाशकांचा अतिरेकी वापर मधमाशांसाठी घातक ठरत आहे. पण त्याशिवाय मधामध्ये कीडनाशकांचा अंश आढळून येत आहे हे जास्त धोकादायक आहे. किडनाशक मंडळाने ३२९ किडनाशके प्रमाणित केली आहेत. तीच शेतकऱ्यांनी वापरावीत. कीडनाशकांमुळे मधमाशा नष्ट होत आहेत. त्यांना वाचवायचे असेल, तर कीडनाशकांचा कमी वापर करून सेंद्रिय शेतीकडे वळावे असेही पाटील म्हणाले.

मधमाशांच्या मुख्य जाती

आग्या माशी आणि फुलोरी माशी या दोन माशांच्या जाती जंगली मधमाशा आहेत. तर सातेरी, मेलीफेरा आणि ट्रायगोना कोती या पेटीत पाळता येणाऱ्या मधमाशा आहेत, अशी माहिती डॉ. सहाणे यांनी दिली. फुलोरी मधमाशी पेटीत घेण्याचे मुख्य कारण म्हणजे ही स्थानिक मधमाशी आहे. ती स्थानिक हवामानाशी जुळलेली असते. स्थानिक पिकांच्या फुलांवर खूप मोठ्या प्रमाणात तिचा आढळ आहे. तसेच तिचा परागीभवनाच्या प्रक्रियेत मोठा वाटा आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT