Prakash Ambedkar: जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांनी दिला सल्ला

Prakash Ambedkar On Manoj Jarange: मनोज जरांगे यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत राजकीय भूमिका घेतली पाहिजे. फक्त एखाद्या पक्षाला पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेता कामा नये. असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांना दिला.
Prakash Ambedkar On Manoj Jarange Patil
Prakash Ambedkar On Manoj Jarange PatilSaam Tv
Published On

>> आवेश तांदळे

Prakash Ambedkar On Manoj Jarange:

मनोज जरांगे यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत राजकीय भूमिका घेतली पाहिजे. फक्त एखाद्या पक्षाला पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेता कामा नये. असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे. अकोला येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गरीब मराठ्यांच्या मधून नवीन नेतृत्व पुढे येत नाही जरांगे पाटलाच्या निमित्ताने ते पुढे आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई येथील मराठा आरक्षणासंदर्भात होणाऱ्या आंदोलनात गरीब मराठ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Prakash Ambedkar On Manoj Jarange Patil
Katraj- Kondhwa Road: पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी 200 कोटींचा निधी उपलब्ध होणार? अजित पवार म्हणाले...

गरीब मराठे जेव्हा मोठ्या ताकदीने जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहतील तेव्हाच श्रीमंत मराठा झुकणार आहे. जरांगे पाटील यांना झुलवण्याचे काम चालू आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. गरीब मराठ्यांचा वर्ग उभा करायचा आहे. रस्त्यावरून जागृती होते. पण, कायदेशीर लढा उभा करायचा असेल तर जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भूमिका घेतली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.  (Latest Marathi News)

गेल्या 35 वर्षांपासून गरीब मराठ्यांचा लढा हा सुरू आहे परंतु, सत्तेतल्या श्रीमंत मराठ्यांनी त्याला कधीही स्वरूप आणि आकार दिला नाही. जरांगे पाटलांच्या निमित्ताने त्याला स्वरूप आणि आकार ही मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

Prakash Ambedkar On Manoj Jarange Patil
Sambhajinagar Accident: पैठण रोडवरील कांचनवाडीत मोठा अपघात! ट्रकची दुचाकी आणि गाड्यांना जबर धडक, महिला जागीच ठार

जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे गरीब मराठ्यांच्या रस्त्यावरचा आवाज येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेतही त्यांचा प्रतिनिधी गेला पाहिजे. त्याचे हे आंदोलन सुरू असताना त्यांचे सहकारी योग्य भूमिका घेतील, अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com