File Photo Saam TV
ऍग्रो वन

Parbhani Farmer : एकाच आठवड्यात चार शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; परभणीतील मानोली येथील घटना

परभणीच्या मानवत तालुक्यातील मानोली गावात गेल्या आठ दिवसात चार शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

राजेश काटकर

Parbhani News : परभणीच्या मानवत तालुक्यातील मानोली गावात गेल्या आठ दिवसात चार शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. सततची नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा तर आता अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या (Farmer) स्वप्नांची राखरांगोळी होत आहे. त्यामुळं शेतकरी आत्महत्येकडे पाऊल उचलत आहे.

मानवत तालुक्यातील मानोली (Parbhani News) हे एक छोटसं गाव. शेती प्रमुख व्यवसाय असणारे व शेतकरी संघटनेचे गाव अशी मानोलीची ओळख आहे. केवळ दोन ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात एकाच आठवड्यात तब्बल चार जणांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. 14 डिसेंबर रोजी रवी काकडे याने गरिबीला कंटाळून गळफास घेतला. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी 15 डिसेंबर रोजी ज्ञानोबा भांड या शेतकऱ्याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. तर 19 डिसेंबर रोजी हनुमान तळेकर यांनी रेल्वेखाली येऊन तर आत्महत्या केली. तसेच 20 डिसेंबर रोजी हरिभाऊ शिंदे यांनी झाडाला गळफास घेतला. (Maharashtra Latest News)

या एका पाठोपाठ अप्रिय घटनेमुळे मानोलीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी, मानवत तहसीलदार,तसेच मनोविकारतज्ज्ञ डॉ. पानझडे, डॉ. अमरदीप, ग्रामसेवक भेट देऊन गावामध्ये होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी गावकऱ्यांशी चर्चा केली. एकीकडे आत्महत्या रोखण्यासाठी शासकीय योजना राबविण्यात येत असल्याचे ढोल वाजवले जात असले तरी या योजना केवळ कागदोपत्रीच राबविण्यात येत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आह़े.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

SCROLL FOR NEXT